आलेख्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर कडून रुग्णांची आर्थिक लूट - रिपब्लिकन सेनेची चौकशीची मागणी

जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निवेदन सादर

लोकनेता न्युज नेटवर्क

धर्माबाद :- जिल्ह्यातील धर्माबाद येथे स्थित असलेले आलेख्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर कडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्या बाबतची पुराव्यासह लेखी तक्रार देऊन सदर हॉस्पिटलची तत्काळ चौकशी करुन चौकशी अंती दोषारोप सिद्ध होताच संबधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे धर्माबाद तालुका अध्यक्ष साहेबराव दुगाने यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे.

          सविस्तर वृत्त असे की, रुग्ण रामजी महादू भद्रे बाभूळगांव ता. धर्माबाद यांना पोटात दुखत असल्यामुळे आलेख्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व हार्ट केअर सेंटर धर्माबाद येथे उपचारासाठी दिनांक 30 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते दुसऱ्या दिवशी डॉ. अरुण मोरे यांनी पेशंटच्या नातेवाईकांची दिशाभूल करुन पेशंटची किडनी व लिव्हर डॅमेज झाल्याचे सांगितले त्यानंतर इतर काही कार्यकर्त्यांनी विचारपूस केल्यावर फक्त किडनीवर सूज आल्याचे सांगितले. रुग्णाच्या लकोणत्याही प्रकारच्या तपासणी न करता लिव्हर डॅमेज झाल्याचे सांगितल्याने डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. किडनीवर सूज आल्याचे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल केली आहे. डॉक्टरांनी खोटे बोलल्याचे क्षण सिसिटीव्ही मध्ये कैद झाले आहे ते तपासल्यास सत्य बाहेर येईल असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. डॉक्टर दिशाभूल करत असल्याचे लक्षात येताच सदर रुग्नाला नातेवाईकांनी नांदेड येथील श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल केल्या नंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना जनरल वार्ड मध्ये ठेऊन उपचार केला आहे. त्यामुळे धर्माबाद येथील आलेख्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याने या गंभीर बाबीची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक करतील का? याकडे रुग्णांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून आहे.

________________________

0/Post a Comment/Comments