लोकनेता न्युज नेटवर्क
हिमायतनगर | राम चिंतलवाड :- हिमायतनगर. ,हदगाव येथील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांचे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा परिषद हायस्कूल हदगाव येथे हे शिबिर आयोजित केले असून नामांकित तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आपली सेवा देणार आहेत. शिबिरामध्ये अनेक आजाराची तपासणी व तसेच उपचार केले जाणार आहेत .मेडिसीन तज्ञ, रक्तदाब , ब्लड, शुगर , बऱ्याच दिवसांचा ताप किडणीचे आजार , हृदयरोग, छातीत दुखणे,धडधड करणे इत्यादी व तसेच नेत्रतज्ञ डोळ्याचे सर्व आजार मोतीबिंदू, शस्त्रक्रिया, तिरळेपणा इत्यादी तसेच सर्जरी तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, यासह छोटे मोठे आजार व तसेच दीर्घ आजारावरही शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.डोळ्यांचे विकार, हाडांचे आजार, किडनीचे आजार, कान नाक-घसा यांचे विकार, त्वचारोग, महिलांचे आजार, मानसिक आजार, दंतविकार अशा विविध रोगांवर मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत. तसेच गरजू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाबाबत बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, "सामान्य जनतेला उत्तम व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. हदगाव व परिसरातील जनतेने या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभघ्यावा असे सांगितले आहे."
________________________
Post a Comment