लोकनेता न्युज नेटवर्क
घनसावंगी | प्रतिनिधी :- दिनांक १२ सप्टेंबर २०२५ शुक्रवार रोजी घनसावंगी शासकीय विश्रामगृहात लोकरत्न पुरस्कार च्या संदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली आहे. त्यानिमित्य लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय भागवतराव वैद्य साहेब यांनी उपस्थित जालना जिल्ह्यातील पदाधिकारी यांना लोकरत्न पुरस्काराच्या संदर्भात योग्य असे मार्गदर्शन केले आहे. हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर महिन्यात होईल. तसेच प्रदेश उपाध्यक्ष अनिश भाई यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना मी तुमच्या सोबत सदैव राहील आणि जिथे मला बोलवतात तिथे मी मदतीसाठी येईल असे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे.
या आढावा बैठकीनिमित्त विशेष म्हणजे लोकशाही पत्रकार संघाचे जालना जिल्हा कार्य अध्यक्ष रामेश्वर तांगडे यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमानिमित्त मराठवाडा अध्यक्ष कुरेशी साहेब, जिल्हाध्यक्ष आनंदे नाना, उपतालुका अध्यक्ष बाबासाहेब , तालुका प्रसिद्धीप्रमुख लहू धाईत, यांची प्रमुख उपस्थिती होती. ही आढावा बैठक अगदी उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली.
________________________
Post a Comment