लोकनेता न्युज नेटवर्क
मुखेड | प्रभाकर पांडे :- मुखेड शहरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी शहरात मुलींना शालेय साहित्य व वृद्धांना छत्री वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.
परवा झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने मुखेड शहराला तिन्ही बाजूने वेडा घातला होता. मोतीनाला नदीला आलेल्या पुरामुळे फुलेनगर, वाल्मिकनगर, महारुद्रनगर आदी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील शालेय विद्यार्थिनींना अर्थात महालक्ष्मीच्या पार्श्वभूमीवर मुलींना आणि वृद्धांना आधार व छत्र म्हणून छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शालेय साहित्य वाटप करताना गरजवंत व पूरग्रस्त मुलींनाच घरी जाऊन आणि २५० अतिशय गरीब व गरजू वृद्धांना बस स्थानक व बाजारात त्यांच्याजवळ जाऊनच छत्र्यांचे वाटप करण्यात आले. मुखेड तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी हार तुरे, शाल व सत्कार न स्वीकारता समाज उपयोगी उपक्रमाने वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
मुखेड शहरात डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व वृद्धांना छत्री वाटप कार्यक्रमात एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितीचे अध्यक्ष बबलू शेख, सय्यद अब्दुल भाई, सय्यद फिरोज जमजम, जय बजरंग मित्र मंडळाचे सदाशिव चव्हाण, सुधीर रॅपनवाड, सय्यद मुजीब, ईरफान शेख, खदीर शेख, अब्दूल शेख, रौफ मुल्ला आदी सहभागी झाले होते.
________________________
Post a Comment