महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणाची मागणी

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई | संदिप जाधव :- महाराष्ट्र राज्यातील तमाम  बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणी साठी  संपूर्ण महाराष्ट्रात  बैठका ठिकठिकाणी  मोर्चे सुरू आहेत.याच संदर्भात मुंबई दौऱ्यावर दौंड शिष्टमंडळाने घेतली भेट  बंजारा समाजाचे धर्मगुरु श्री बाबुसिंग महाराज राठोड  यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  बापुनीं या ST आरक्षण चळवळीच्या रूपरेषा व मार्गदर्शन घेतले. सर्व मित्रांसोबत आम्हाला आशिर्वाद व.शुभेच्छा दिल्या  तसेच  कँबीनेट मंत्री श्री संजय भाऊ राठोड  त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन मुखेड तालुका व दौंड तालुका बंजारा तांडयातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. या पुढे आरक्षण संदर्भात  लेखी निवेदन मुखेड तालुका बंजारा समाज वतीने देण्यात आले.
          या वेळी मा.भारतभाऊ चव्हाण  मंग्याळकर मुखेड संदीप भाऊ चव्हाण संजय भाऊ कांबळे सोमनाथ श्रीरामे सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य विकास राठोड, व   पुणे जिल्हा उद्योजक संतोष राठोड , उद्योजक सुनील चव्हाण, शंकर चव्हाण, नितिन चव्हाण  नामदेव राठोड उपस्थित होते. शेवटी. मिथुन राठोड यांनी उपस्थिताचें आभार व्यक्त केले.
________________________

0/Post a Comment/Comments