लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड | गोविंद पाटील मोरे :- नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी सायाळ ता लोहा येथील पूरग्रस्थ भागाला भेट देऊन बाधीत शेती पिकांची पाहणी करून उपस्थित शेतकरी बांधवांना धिर देऊन मार्गदर्शन करतांना सांगितले किया अस्मानी संकटाचा सामना धैर्यानी करावा सरकार आपल्या पाठिशी खबिरपणे उभे आहे. नुकसान ग्रस्थ पिकांचे पंचनामे करण्यात येतील आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी पर्यंत करणार आहे अशी ग्वाही आमदार आनंदराव बोंडारकर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली यावेळी जेष्ठ प्रगतिशील शेतकरी रामराव पाटील पवार , कृषी पर्यावेक्षक लक्षण हंडे , मंडळ अधिकारी सुत्रावे , तलाठी पांडागळे , ग्रामसेवक राठोड , सरपंच अण्णासाहेब पवार , प्रगतशिल शेतकरी ,रत्नाकर पाटील ढगे , सुदाम मामा ढगे , मदनमामा ढगे , केशव ढगे , सुदाम पवार , दशरथ पवार, एकनाथ मोरतळे, सहयाद्रीचे कैलास सावंत यांची उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना सरसगट ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. सौर उर्जा कृषी पंप त्वरित दुरुस्त करण्यात यावीत. नदी काठच्या शिंचन विहिरीचे गाळ काढण्यात यावा अशी मागणी रत्नाकर ढगे यांनी केली .सायाळ येथील शेतकरी चंदनसिंग ठाकूर यांच्या घरात पुराचे पाणी शिरले व घरातील साहित्य खराब झाले यांची पाहणी आमदार बोंढारकर यांनी केली.
________________________
Post a Comment