लोकनेता न्यूज नेटवर्क
सेनगाव (महादेव हरण) :- शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणरायाचे आगमन झाले असून आता काही दिवसावर गणरायाचे विसर्जन होणार असल्याने शासनाच्या नियमाचे पालन करावे, गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा परंतु काही शासनाचे नियम पाळून विसर्जन करावे असे सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व सेनगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गणेश गांजरे यांनी मंडळांना आव्हान केले आहे, सर्वत्र गणरायाचे आगमन धुमधडाक्यात झाले असून आता विसर्जन करते वेळेस डीजे, अथवा (कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी)फटाक्याची आतिषबाजी टाळावी ठराविक ठिकाणी गणरायाचे विसर्जन करावे ग्रामपंचायत, नगरपंचायत, पोलीस स्टेशन यांच्या नियमाचे पालन करून ठराविक ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे कुठेही विसर्जन करू नये विसर्जन करता वेळेस ठराविक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन करावे जेणेकरून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे अहवाल सेनगाव नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गणेश गांजरे यांनी केले आहे तसेच विसर्जन हे कृतिम तलावातच करावे.तर डीजे व फटाक्याची आतिषबाजी किंवा कुणाला त्रास होईल असे कृत्य करू नये पारंपारिक पद्धतीने शांततेत गणरायाचे विसर्जन करावे व नियमाचे पालन करावे असे आव्हान सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी केले आहे.
________________________
Post a Comment