आदर्श विद्यालय सिंदखेडराजा येथे भव्य गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा संपन्न

विविध देखाव्याद्वारे केली जनजागृती

लोकनेता न्यूज नेटवर्क

सिंदखेड राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर,सिंदखेडराजा येथे 6 सप्टेंबर रोजी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्गाचे   समाज जनजागृतीपर देखावे सादर करण्यात आले.
यावेळी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याकरिता विद्यालयाचे स्थानिक सल्लागार श्री.अनंतराव खेकाळे, श्री.तुळशीदासभाऊ चौधरी,श्री . दिलीपभाऊ काळे, श्री.काशिनाथराव भालेराव व श्री.सुभाष मोरे सर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पांची पूजा व आरती करण्यात आली.प्रसादाचे वाटप केले. यावेळी आदर्श विद्यालयातील इ.3 ते इ.10 वी व आदर्श कॉन्व्हेन्टमधील  इ.3 व 4 थीतील विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन सिंदखेड राजा नगरीतून  काढली.त्यामध्ये विविध अप्रतिम देखावे सादर केली.त्यामध्ये सुरवातीस मुलींचे बँडपथक नंतर गणरायांची मूर्ती नंतर वारकरी दिंडी,झाडे लावा झाडे जगवा, तुळस लावा - पर्यावरण वाचवा, मोबाईलचे दुष्परिणाम, विविध भारतीय वेशभूषा, प्रयागराज महाकुंभ 2025, कावड, पाऊली, नारीशक्ती वेशभूषा, टिपरी पथक, लेझिम पथक असे  विविध धार्मिक ,सांस्कृतिक देखावे सादर करून पाहणाऱ्या प्रेक्षकांनी मनमोहक देखावे पाहून पुष्पवृष्टी करून स्वागत व कौतुक केले. यावेळी मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेवटी शाळेजवळील विहिरीमध्ये गणरायांचे विसर्जन करण्यात आले.गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
________________________

0/Post a Comment/Comments