लोकनेता न्युज नेटवर्क
किनगाव राजा | महेश मुंढे :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथील फुलेनगर येथील शासकीय गट क्रमांक 525 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प अंतर्गत हा प्रकल्प सुरू होणार आहे परंतु काही नागरिकांनी याला आक्षेप दर्शविला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की मानवी वस्ती जवळ हा प्रकल्प असल्यामुळे मानवी आरोग्य व पर्यावरणावर याचा परिणाम होऊ शकतो, नागरिकांच्या मते प्रकल्पासाठी बसवण्यात येणारे सौर पॅनल हे परिसरातील तापमान वाढवतात, त्यामुळे याचा परिणाम मानवी आरोग्यावर होऊ शकतो व त्यातून प्रदूषण वाढण्याची भीती देखील आहे.
तज्ज्ञांच्या मते सौर ऊर्जा निर्मिती ही हवामान बदलाच्या समस्येवर मोठा उपाय आहे, सौर ऊर्जा ही आजच्या काळाची गरज आहे हे निर्विवाद सत्य आहे. विजेच्या वाढत्या मागणी पुढे आणि हवामानाच्या बदलत्या भीषण आव्हान पुढे ऊर्जा निर्मितीचे पर्याय शोधणे अपरिहार्य आहे आणि सौर ऊर्जा हा त्यातील सर्वात शाश्वत पर्याय मानला जातो. आणि तसे पाहता आपण जर पाहिले तर मानवी वस्तीमध्ये, मोठमोठ्या इस्पितळांवर, धार्मिक स्थळांवर, व्यावसायिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे त्यातील प्रत्येक जण आपली स्वतःची वीज निर्मिती करून निरोगी व आनंदी आहेत त्यांचा कुठलाही आक्षेप नाही. राहिला प्रश्न मानवी आरोग्यास धोका असल्याचा तर आपल्या गावात असलेले मोबाईल टावर हे सौर ऊर्जा पेक्षा जास्त घातक आहेत तरीदेखील आपण त्यांच्या सानिध्यात राहतोच, त्यातून निघणारे रेडिएशन हे मानवी आरोग्यास किती घातक आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही झाले आहे.
आजच्या काळात ऊर्जा ही प्रत्येक देशाची गाव खेड्यांच्या विकासाची कणा मानली जाते. दगडी कोळशाच्या इंधनावर चा वाढता ताण त्यातून निर्माण होणारे भयावह प्रदूषण व हवामान बदल यामुळे पर्यायांचा शोध घेणे अपरिहार्य झाले आहे,
या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा हा एक महत्त्वाचा शाश्वत पर्याय ठरत आहे,सूर्याच्या अक्षय ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणे म्हणजे प्रदूषण मुक्त वीज वापरणे हेच होऊ शकते.
सरकार व स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत यांची जबाबदारी फक्त प्रकल्प उभारण्यापूर्तीच मर्यादित नसून त्यांनी देखील स्थानिक पातळीवर जनजागृती करणे हे देखील महत्त्वाचे आहे.किनगाव राजा येथील शासकीय गट क्रमांक 525 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने शेकडो झाडे लावली व ग्रामपंचायतीने त्याचे योग्य संगोपन देखील केले परंतु वनीकरणातील ही झाडे देखील पर्यावरणास कितपत योग्य आहेत याचा देखील या विचार करायला हवा, गिरीपुष्प नावाची ही झाडे विषारी असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी या आधीच केला आहे, सरपटणारे प्राणी जसे पाली, उंदीर, साप,सरडे व एवढेच नाही तर वन्यजीव व पक्षी देखील या झाडांच्या सानिध्यात राहत नाहीत, या झाडांच्या फुलांचा गंध इतका उग्र असतो की आपला शेतकरी वर्ग पिकांमध्ये उंदरांचा प्रभाव वाढू नये म्हणून ह्या झाडाची फुले शेतामध्ये ठिकठिकाणी टाकतात.
तर मग अशा ठिकाणी पर्यावरण पूरक प्रकल्प उभा राहत असेल तर हा प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी कितपत योग्य आहे!
पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे की सोलार पॅनल साठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व मोकळ्या जागेचा वापर होत असल्याने स्थानिक जैवविविधतेवर याचा परिणाम होऊ शकतो, तर दुसरीकडे प्रशासनाचे म्हणणे आहे की हा प्रकल्प शासकीय नियम व पर्यावरणीय मानदंड पाडूनच मंजूर करण्यात आला आहे.
"श्री प्रकाश मुंढे सरपंच ग्रामपंचायत किनगाव राजा यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की या प्रकल्पासंदर्भात नागरिकांचे प्रश्न अधोरेखित करत प्रशासनासमोर मांडले आहेत व लवकरच हा प्रकल्प नागरिकांच्या पाठिंब्याने गावाच्या विकासासाठी उभा करू व हा प्रकल्प शासकीय व पर्यावरणीय मानदंड पळूनच मंजूर करण्यात आला आहे, भविष्यात गावाच्या विकासाला गतीही मिळेल आणि नवनवीन शासकीय योजना व प्रकल्प यांचा फायदा ही मिळेल व शासकीय जमिनीवरचे होणारे अतिक्रमण देखील रोखता येईल."
सौर ऊर्जा ही काळाची गरज आहेच पण नागरिकांची मागणी ही देखील हट्टीपणा नसून विकासाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न समजून प्रशासनाने व ग्रामपंचायत किनगाव राजा यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही गरजेचे आहे.
________________________
Post a Comment