सिंदखेड राजा :- शिक्षण प्रसारक मंडळ,चिखली द्वारा संचलित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर सिंदखेडराजा येथील विद्यार्थ्यांनी सिंदखेड राजा तालुका शालेय क्रीडा स्पर्धा 2025-2026 यामध्ये सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा 24 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाल्याअसून त्यामध्ये 100 मी, 200 मी, 400 मी ,800 मी धावणे शर्यत स्पर्धा ,गोळा फेक ,लांब उडी, कबड्डी, खो-खो अशा वेगवेगळ्या स्पर्धेत एकूण 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक ८ सप्टेंबर व 9 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत कुस्ती स्पर्धेत गौरव विष्णू चेपटे-प्रथम क्रमांक, 200 मीटर धावणे स्पर्धेत वीरू सुभाष मगर याचा द्वितीय क्रमांक, लांब उडी स्पर्धेत कु.श्रावणी अमोल कुडके- प्रथम क्रमांक, कु. दिपाली सदाशिव झिरपे-द्वितीय क्रमांक, आदित्य बळवंता काकडे-प्रथम क्रमांक हे सर्व विद्यार्थी तालुकास्तरावर यांनी बाजी मारली आहे तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. सदर विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.टी.मोरे सर व सर्व शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार करण्यात आला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
________________________
Post a Comment