राजकुंवर महाविद्यालय, वाघ्रुळ येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी


लोकनेता न्युज नेटवर्क 

वाघुळ (प्रतिनिधी) :- दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी राजकुंवर महाविद्यालय, वाघ्रुळ येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रा. राजेंद्र जायभाये सर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती प्रा. डॉ. सरला डोईफोडे मॅडम व प्रा. विजयकुमार देशमुख सर यांनी दर्शविली.

या प्रसंगी प्राचार्य प्रा. राजेंद्र जायभाये सर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या जीवनप्रेरणेवर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला प्रा. प्रवीण गाडेकर, प्रा.चंद्रमुनी जोगदंड, प्रा. समाधान सरोदे, प्रा. अरुण गिते, प्रा. दुर्गा रुपणर मॅडम, प्रा. कु. श्रद्धा सतकर मॅडम, प्रा. शेख शारेक, प्रा. भगवान जोगदंड,प्रा.रेणुका चित्राल मॅडम, प्रा. मनोहर खरात, प्रा. महाजन मॅडम, प्रा. एस. खरात, श्री. संतोष जाधव, श्री. सुनील शिंदे, श्री. गजानन जोगदंड तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सरला डोईफोडे मॅडम यांनी केले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments