हा शेवट नाही ही, तर नवी सुरुवात! -प्रविण गीते

लोकनेता न्युज नेटवर्क

   खरे तर मी शासकीय सेवेत आलो ते कुटुंबाच्या जबाबदारीतून, वडीलांचं छत्र हरपलं होतं याचं अतोनात दुःख मनात होतं. सगळ्यांना मिळणारं वडिलांचं प्रेम आणि आधार आपल्या वाट्याला का नाही ही भावना नेहमी मनात घर करायची. यातूनच ज्यांचं कुणी नाही त्यांचा आधार बनावा या विचाराने जन्म घेतला आणि शक्य त्या मार्गाने गरजवंताना मदतीचा हात देण्याची सवय जडली. त्यामुळे माझ्या कार्यालयात येणारा प्रत्येक गरजू व्यक्ती माझ्या कुटुंबाचा सदस्य असल्याचं मानून मी काम केलं. माझ्या संपुर्ण सेवेतलं हे माझं संचित आहे. ही माझी जपलेली सर्वात मोठी ठेव आहे. बाकी माझ्या फकीरी वृत्तीमुळे मागे काही न सोडण्याचा नियम ईथेही कायम ठेवत,आज मी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारतो आहे. पण मी जर काही कमावलं तर ती तुमच्यासारखी जिवापाड प्रेम करणारी असंख्य निष्ठावान माणसं. हेच लक्षात ठेऊन आज पंचायत समितीचं आवार सोडताना अतिशय भावनिक होऊन पण प्रचंड अभिमानाने घराकडे परततोय. हा शेवट नाही तर एक नवी सुरवात आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याचा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा अनुभव गाठीशी ठेऊन राजकीय क्षेत्रात पुर्णवेळ कार्यरत होत आहे. माझा हा निर्णय तुम्ही चुकीचा ठरू देणार नाहीत हा विश्वास आहे. या विश्वासासह या शासकीय सेवेतून दूर होतो आहे. आता तुमच्या कुटुंबातील हा सदस्य पुर्णवेळ तुमच्याकरीता झटण्यासाठी सज्ज झाला आहे.

________________________

0/Post a Comment/Comments