लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :- शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, सिंदखेडराजा येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुभाष मोरे सर मुख्याध्यापक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे स्थानिक सल्लागार श्री. अनंतराव खेकाळे हे होते . यांच्यासह आदर्श कॉन्व्हेन्टच्या मुख्यध्यापिका कु. केदार मॅडम व उपक्रम प्रमुख कु. गोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व धनाची देवता माता लक्ष्मी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले.शाळेच्यावतीने प्रमुख अतिथींचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिवाळीच्या विविध दिवसांची आख्यायिका सांगितली. त्यामध्ये वसुबारस - श्री.प्रशांत मापारी सर ,धनत्रयोदशी -श्री.महादू दांडगे सर,नरक चतुर्दशी - कु.के.एस.गोरे मॅडम, लक्ष्मीपूजन -श्री.राजु मेहेत्रे सर पाडवा -श्री.संजय भूतेकर सर,भाऊबीज - कु.जे.बी.मानेमॅडम अशाप्रकारे सर्व शिक्षकांनी दिवाळीचे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
दीपोत्सवानिमित्त सर्व वर्गांची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या, झेंडूची तोरणे लावली, आकाशकंदील व दिव्यांनी वर्ग सजवले. संपूर्ण शाळा उजळून निघाली होती. सायंकाळी संपूर्ण इमारत दिवे लाऊन सजविण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन दाभाडे सर यांनी केले तर आभार श्री संजय भुतेकर सर यांनी मानले.यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी- शिक्षक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment