संकटाच्या काळात शिवछत्र परिवार कायम जनतेच्या पाठिशी - रणवीर पंडित शारदा प्रतिष्ठानच्यावतीने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप


लोकनेता न्यूज नेटवर्क

गेवराई (ज्ञानेश्वर उदावंत) :- नैसर्गिक आपत्ती येते तेंव्हा गेवराई विधानसभा मतदार संघातील प्रत्येक नागरीकाच्या पाठिशी शारदा प्रतिष्ठान आणि शिवछत्र परिवार खंबीरपणे उभा राहत आला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि गोदावरी व सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले अशावेळी शिवछत्र परिवाराने सर्वांना धिर दिला. सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे हिंगणी हवेली व परिसरातील नागरीकांचे प्रचंड हाल झाले. या भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचही मोठे नुकसान झाले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणे आणि संकटाच्या काळातही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणे हा शारदा प्रतिष्ठानचा हेतू आहे असे प्रतिपादन शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी केले. हिंगणी हवेली येथे शालेय विद्यार्थ्यांना शारदा प्रतिष्ठानच्यावतीने शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

गेवराई विधानसभा मतदार संघातील सिंदफणा नदीला आलेल्या महापूरामुळे या नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हिंगणी हवेली येथे शारदा प्रतिष्ठानच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, सरपंच शाहेद पटेल, अशोक ढास, शेख सद्दाम, पठाण रिजवान, शेख सादेक, शिवनाथ बुधनर, अंगद बुधनर, संभाजी वडमारे, कैलास निर्मळ, वाहेद बेग, अजय घोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणवीर पंडित पुढे म्हणाले की, कठिण परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. शिवछत्र परिवार संकटाच्या काळात नेहमीच गेवराई विधानसभा मतदार संघातील नागरीकांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. पूर परिस्थितीमध्ये निवारा उभारून पूरग्रस्तांना आधार दिला, विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचेही या पूर परिस्थितीमध्ये प्रचंड नुकसान झाले. मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम यानिमित्ताने होत आहे. गोदावरी नदी काठावरील गावाच्या विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्य वाटप केले जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदुर हवेलीचे सरपंच शाहेद पटेल यांनी केले. यावेळी कु.सोनल बुधनर या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले, उपस्थितांचे आभार बिभिषण कदम यांनी मानले. यावेळी हिंगणी हवेली आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments