लोकनेता न्यूज नेटवर्क
आर्णी (अनिकेत खारोळ) :- आर्णी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक ओपीडी असलेल्या लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असून, यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या केंद्रातील बहुतेक कर्मचारी वेळेवर उपस्थित होत हजर राहत नाहीत तसेच मुख्यालयी राहत नाही, ही धक्कादायक बाब असून आरोग्य विभागाच्या निष्क्रीय कारभारावर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, रात्रीच्या वेळी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत आर्णी किंवा यवतमाळ येथे रेफर करावे लागते. त्यामुळे नागरिकांचा लोणी केंद्रावरील विश्वास उडत असून, ते थेट खाजगी दवाखान्याकडे किंवा शहराकडे रुगणाला घेऊन धाव घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या केंद्रात एकूण 11 कर्मचारी कार्यरत असतानाही उपकेंद्रावरील कर्मचारी अनेकदा रात्रीच्या वेळी लोणी येथे ड्युटी बजावताना दिसतात. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, जर हे कर्मचारी येथे सेवा बजावत असतील, तर त्यांच्या मूळ उपकेंद्रावरील कामकाज कोण पाहते? अशा प्रकारच्या गैरव्यवस्थेमुळे दोन्ही ठिकाणची रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या केंद्रासाठी एकूण ११ पदे मंजूर असून, सध्या १० कर्मचारी कार्यरत आहेत, तर एक कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेला आहे. इतके कर्मचारी असूनही कोणीही मुख्यालयी राहत नाही, हे आश्चर्यकारक आहे. या आधीही केंद्रातील डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने बऱ्याच तक्रारी झाल्या होत्या त्या नंतर लोकमत ने ती गंभीर बाब लाऊन धरल्याने प्रश्न निकाली लागला होता आता पुन्हा जैसे थे झाली आहे नागरिकांचा आरोप आहे की, कार्यरत कर्मचाऱ्यांना मुभा देऊन उपकेंद्रावरील कर्मचाऱ्यांना येथे ड्युटीला बोलावले जाते, जे नियमबाह्य आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश द्यावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment