किनगाव राजा (महेश मुंढे) :- दि. 31- 10 -2025 सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा गावाच्या ऐक्य व शांततेसाठी कार्य करणाऱ्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच जितेंद्र कायंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत गणेश काकड, जितेंद्र कायंदे, कृष्णा कायंदे या तिघांचे अर्ज आलेले होते, निवड प्रक्रिये दरम्यान तरुणांना नवीन संधी मिळावी या उद्देशाने गणेश काकड यांनी जितेंद्र कायंदे यांना पाठिंबा दिला, ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
गावातील सर्व ग्रामस्थांनी एकमताने जितेंद्र कायंदे यांच्यावर विश्वास दर्शवत तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद सोपवले, निवडीनंतर बोलताना जितेंद्र कायंदे यांनी सांगितले की " गावात सर्व समाजामध्ये ऐक्य, शांतता आणि परस्पर सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तंटामुक्त गाव हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे ." असे त्यांनी नमूद केले.
नवीन अध्यक्षांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून गावात शांतता, सलोखा व विकासाचे वातावरण टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरतील असा विश्वास उपस्थित त्यांनी व्यक्त केला.
ग्रामसभेच्या बैठकीस ग्रामसभा अध्यक्ष पद संतोष साहेबराव काकड यांच्याकडे दिले होते, ग्रामसेवक - अमोल मेहेत्रे, सरपंच- प्रकाश मुंढे, सदस्य- सखाराम हरकळ, दत्तात्रय झोरे, दीपक पडुळकर, योगेश चतुर, व इतर आणि कारभारी चौरे ( मा. तं. अध्यक्ष), दीपक पाटील ( मा. तं. अध्यक्ष ), रामेश्वर काकड(मा. सरपंच), ज्ञानेश्वर कायंदे (मा. सरपंच ), कार्तिक कायंदे, अमोल साळवे, रमेश काकड, राजू राजे, सचिन राजे ( वार्ताहर ), आसिफ कुरेशी (वार्ताहार), पवन कुलकर्णी, श्रीकांत काळुसे, संदीप काळुसे, गजानन मुंढे, संतोष नागरे, रामा काकड,सचिन मांटे, शिवानंद मुंढे, शरद मुंढे,वैभव दराडे, लहू कुटे, संतोष काकड,शेख मोहसीन, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्वांनी नवीन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment