हिमायतनगर येथे काँग्रेस ची मार्गदर्शन व आढावा बैठक संपन्न.


लोकनेता न्यूज नेटवर्क

हिमायतनगर (राम चिंतलवाड) :- हिमायतनगर येथील साई मंदिरांच्या परीसरात नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची महत्व पूर्ण आढावा बैठक पार पडली. सघटन मजबुत करण्यासाठी ही बैठक आयोजीत करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते, प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर व स्थानीक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ईच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीच्या वेळी अनेक ईच्छुकानी शक्ती प्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसह बैठकीला उपस्थिती लावली होती तिकीट वाटप आणि संघटन शक्ती यावर चर्चा झाली जिल्हा अध्यक्ष राजेश पावडे यांनी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी साठी एक नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकांची निवड होणार असून यासाठी प्रत्येक प्रभाराचा अभ्यास, बुथलेव्हल नियोजन आणि कार्यकर्त्यांची बाधीलकी आवश्यक असल्याचे प्रतीपादन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

भूमिका घेणे आवश्यक असून शेतकरी उध्वस्त होत असताना सरकारकडून मदतीचा फोल दिखावा केला जात असल्याची टीका करण्यात आला कर्जमाफी साठी चालढकल, नुकसान काळात दुर्लक्ष आणि धर्मवाद जातीय वादाचा वापर करून दिशाफुल केल्याचा आरोप प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र घोडजकर यांनी केला. मतभेद विसरून एकजुटी वर भर, उमेदवारी न मिळाल्यास नाराजी न करता पक्षाचे काम प्रामाणीक पणे करावे आरक्षण न पाहता आपला माणुस जिंकला पाहीजे हा विचार ठेवून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवहान महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सतीश पाचपुते यांनी केले अध्यक्ष स्थाना वरून बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी असे म्हटले आहे. मतदान करणाऱ्या मतदानाच्या मनामध्ये असणाऱ्या उमेदवारांना त्या वार्डातील उमेदवारी देऊ कारण त्या ठिकाणी जनतेच्या मनातून परीक्षेतून पास होईल त्यांना उमेदवारी देऊ सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करून " खोटं बोल पण रेटून बोल" या पध्दतीचे सध्याचे सत्ताधारी काम करत असुन केवळ घोषणाबाजी आणि दिखावा सुरू असल्याची टीका केली मागील शासन काळात मंजुर झालेली कामे आजही सुरू असल्याची आठवण करून देत लोकांना भ्रमात न राहण्याचे आवहान केले तसेच ईच्छूकानी जनतेच्या संपर्कात राहावे समस्या पुढे आणाव्या मतदार याद्या मध्ये होणारे घोळ तपासुन हरकती दाखल करण्या बरोबर बुथ मजबुत करावा मतदार याद्या तपासुन एक एक मत मिळवा आप आप सातील मतभेद बाजुला ठेवून काँग्रेस ला विजयी करण्यासाठीं सर्वानी प्रामाणीक कार्य करावे असे आवाहन उपस्थीताना केले आजच्या आढावा बैठकी मुळे पक्ष कार्यकर्त्यां मध्ये नव चैतन्य निर्माण झाले असुन यावेळी हजारोंच्या संख्येने ईच्छुक उमेदवार काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments