लोकनेता न्युज नेटवर्क
बीड (पांडुरंग हराळे) :- काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटवरून आडनावे हटवून फक्त नाव आणि पद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
“पोलिस हे सर्व समाजासाठी एकसमान आहेत, त्यांच्या वर्दीत कोणतीही जात नाही. आम्ही फक्त पोलीस आहोत, एखादा पोलीस चुकीचा असेल तर त्याच्यावर कारवाई होईल; पण जातीवरून ओळख निर्माण होऊ नये,” असे स्पष्ट वक्तव्य त्यावेळी पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांनी केले होते. या निर्णयामुळे पोलिसांविषयीचा जातीवर आधारित अविश्वास कमी होईल, असा उद्देश होता.
मात्र, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या प्रेस नोट्समध्ये पोलिस कारवायांशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची पूर्ण नावे (आडनावासह) नमूद केली जातात, एवढेच नव्हे तर संबंधितांचे फोटोसह प्रकाशन देखील केले जाते.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की,
> “पोलिसांच्या नावापुढे आडनाव न लावण्याचा आदेश दिला असताना अधिकृत प्रेस नोटमध्ये मात्र पूर्ण नाव आणि आडनावासह फोटो प्रसिद्ध करण्याचे कारण काय? अशा स्थितीत या उपक्रमाचा प्रत्यक्षात काय उपयोग राहतो?”
डॉ. गणेश ढवळे यांनी या विसंगतीवर प्रशासनाचे लक्ष वेधत स्पष्ट केले की, जर उद्देश पोलिसांवरील जातीय ओळख कमी करणे हा असेल, तर तो सर्वच स्तरांवर काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. : ८१८०९२७५७२
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment