आयुर्वेदातील संशोधनासाठी शासनाचे अनुदान, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा – डॉ. जाई किरण किनी आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिले संशोधनविषयक मार्गदर्शन


लोकनेता न्युज नेटवर्क

बीड (प्रतिनिधी) :- आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या संकल्पनेतून व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात “आरोग्यशास्त्रातील आजच्या आधुनिक कालानुरूप संशोधन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रिसर्च कौन्सिल मेंबर व केंद्र शासन आयुष रिसर्च ऍडव्हायझरी कमिटी मेंबर असलेल्या मुंबईच्या डॉ. जाई किरण किनी यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “Conducting Clinical Trials and Writing Research Paper – A Practical Guide” या विषयावर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.

सकाळी १०:३० वाजता धन्वंतरी पूजन व स्तवनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर चार सत्रात ही कार्यशाळा पार पडली. सुरुवातीच्या सत्रात संशोधनाची व्याख्या, गरज आणि प्रकार यांवर त्यांनी सखोल विवेचन केले. पुढील सत्रांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी वेगवेगळी प्रायोगिक मार्गदर्शक सत्रे घेण्यात आली. भोजनोत्तर सत्रात त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध संशोधन योजनांची माहिती दिली. अंतिम सत्रात विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष रिसर्च पेपर लिहून घेत मार्गदर्शन करण्यात आले.

 या कार्य शाळेत आदित्य आयुर्वेद महाविद्यालये सर्व वर्षाचे २०० विद्यार्थी, ४० प्राध्यापक तसेच विशेष म्हणजे आदित्य दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर (MDS) च्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला.

विद्यार्थी सकाळी १०:३० पासून ५ वाजेपर्यंत कार्यशाळेत दिवसभर तेव्हढ्याच उत्साहात राहिल्यामुळे डॉ.जाई किरण किनी म्हणाल्या की मी संपूर्ण भारत, विदेशात याविषयावर कार्यशाळा, व्याख्याने घेतली आहेत पण मराठवाड्यात सारख्या दुर्गम भागात असे अनुशासीत, सदैव शिकण्याकरता तत्पर विद्यार्थी घडवणारे, विद्यार्थ्याकरिता एव्हढे कष्ट घेणारे संस्थाचालक प्रथमच पाहिले. त्यांनी या करिता डॉ. आदिती सारडा यांचे विशेष आभार व्यक्त करुन कौतुक केले.

 कार्यशाळेचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. शाम जोशी यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. स्नेहा साबळे यांनी केले. प्रदीप राठोड, विष्णू झरकर, ऋतुजा देशमुख, द्वितीय वर्षाचे सुशील कांबळे, सानिया बनेवाले, ऋतुजा नवले, प्रथम वर्षाचे गायत्री दुधाळ, क्रांति भुंबे, सायली वाघ, रेहान मुल्लानी, साद चाऊस या ११ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्टेजवर समोर येवून कार्यशाळे विषयी आपला अभिप्राय दिला. प्रा. रामेश्वर ढोबळे यांनी आभार मानले.

आयुर्वेदाची आपल्याला नितांत गरज आहे. आयुर्वेदामध्ये आधुनिक संशोधन होणे गरजेचे आहे. पदवीच्या विद्यार्थांचा संशोधनात सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आयुर्वेदावर प्रोजेक्ट लिखान, संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान असते. विद्यार्थ्यांनी या शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आयुर्वेदात आधुनिक संशोधन करावे. या संदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी मला आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात बोलावण्यात आले होते. आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थी खूप उत्साही आहेत. काहीतरी नविन शिकण्याचा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.

—डॉ. जाई किरण किनी

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments