लोकनेता न्यूज नेटवर्क
मुक्रमाबाद (दादा गुमडे) :- मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाकडून माजी राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅक समन्वयक प्रा. भारतभूषण बाळबुधे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेख जी.जी. व श्री संतोष पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो.विभागाचे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. रामदास मादळे यांनी केले. तर प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ.विलास पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.रवींद्र बाविस्कर यांनी ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार आणि कार्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास डॉ. सूर्यकांत सकनूरे, डॉ. बालाजी खराबे, डॉ.रमाकांत बिडवे,डॉ. नारायण पांचाळ,प्रा.अंकुश शिंदे, प्रा.रवीकुमार ढोकाडे,डॉ.एम. एम. सय्यद, डॉ.एकनाथ भिंगोले,सौ.कविता कोठारे मॅडम व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment