समर्थ कृषी महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम


लोकनेता न्युज नेटवर्क

देऊळगाव राजा (प्रतिनिधी) :- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे बी.एस.सी कृषी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे यांनी केले. महाविद्यालयाची ओळख, अभ्यासाची आखणी ,व्यक्तिमत्व विकास, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विकास कौशल्य ,उद्योग मार्गदर्शन व विकासासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मेहेत्रे प्रा.चगदळे, प्रा. जाधव, प्रा. पाटील, प्रा.सोळंकी, प्रा. नागरे ,प्रा. जायभाये, प्रा. घुगे, प्रा. देशमुख, प्रा. इंगळे, प्रा. म्हस्के उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.पंजाबराव देशमुख, स्व.देवानंद कायंदे आणि भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली. डॉ.नितीन मेहेत्रे यांच्या हस्ते उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुरुवात ही सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन, प्रेरणादायी, अध्यात्मिक विचार आत्मसात करुन झाली पाहिजे असे विचार मांडले. शिस्तबद्ध शिक्षणामुळे ज्ञान,आत्मविश्वास, खेळामुळे कार्य क्षमता वाढते असे सांगितले. अध्यक्षा श्रीमती नंदाताई कायंदे व सचिव सतीश कायदे यांनी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व उद्योगासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.

पोलीस उपअधीक्षक मॅडम मनीषा कदम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

तसेच श्रीकांत दायमा यांनी “कृषिक्षेत्रातील एआय, रोबोटिक्स आणि आयओटी” च्या उपयोगाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे प्रोत्साहन दिले.

 डॉ.संदीप नागरे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य बद्दल विशेष माहिती दिली व ताण-तणावापासून कसे मुक्त राहावे यावर मार्गदर्शन केले. प्रा.अश्विनी जाधव यांनी योग, आरोग्य, मेडिटेशन, तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी दीदी यांनी सस्टेनेबल एग्रीकल्चर विषयावर मार्गदर्शन केले.

योग व ध्यानाच्या माध्यमातून आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिले, तर शाश्वत शेती व “क्रॉप मेडिटेशन थेरपी” द्वारे संतुलित विकासाचा संदेश दिला.

बँकिंग स्पर्धा परीक्षा, धार्मिक मूल्ये व मराठी साहित्य यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागरूकता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मूल्यांची जाण निर्माण झाली.

कवी प्रा. मधुकर जाधव यांनी काव्यवाचनातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची ओढ निर्माण केली, तर प्रा. अश्विनी जाधव यांनी स्वरचित कवितेद्वारे प्रेरणा दिली.

नवरात्र विशेष सत्रात त्यांनी “शक्ती, आत्मविश्वास, संस्कार आणि करिअर” या विषयावर मार्गदर्शन करत दुर्गामातेच्या नऊ रूपांतून जीवनमूल्यांचा संदेश दिला.

या सत्रातून विद्यार्थ्यांना चारित्र्य, प्रामाणिकपणा व समाजसेवेचे महत्त्व समजले आणि नवीन उर्जा व आत्मविश्वास प्राप्त झाला. बँकिंग क्षेत्रातील मार्गदर्शन सत्रात राहुल सावळे, सतीश कायंदे, सोपान गवळी,संदीप साबळे व प्रदीप पवार यांनी विद्यार्थ्यांना बँकिंगमधील करिअर संधी, स्पर्धा परीक्षा तयारी व कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले.

या सत्रातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, करिअरविषयक दिशा व प्रेरणा मिळाली.समर्थ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील खरीप शिवार फेरीत सहभागी झाले.यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांच्याशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांनी विविध पीक वाण, आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती व कृषी प्रक्रिया उद्योगाचे प्रात्यक्षिक पाहून शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

या फेरीतून विद्यार्थ्यांना नव्या पिक वाणांबाबत तसेच शाश्वत शेती तंत्रज्ञानाबाबत मौल्यवान ज्ञान मिळाले.भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक, क्रिकेट, खो-खो, रस्सीखेच, लांब व उंच उडी अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत खेळांविषयी जागरूकता व टीमस्पिरिट विकसित केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व इतर कर्मचारी हजर होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments