दिपावली सणानिमीत्त गांधीचौक पोलीसांची सतर्कपणे पायी पेट्रोलींग.


लोकन्याय न्यूज नेटवर्क

निलंगा (इस्माईल शेख) :- याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या जिल्हयासह लातूर शहरात दिपावली सण मोठ्या आनंदात साजरा होत असतो त्यानिमीत्त शहरातील व जिल्हयातील अनेक भागातुन नागरीक खरेदी साठी लातूर शहरात येत असतात त्यामुळे लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई, सराफ लाईन, कापड लाईन, भुसार लाईन, भांडी गल्ली, मज्जीद रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होते व शहरामध्ये वाहतुक कोंडी होवुन येणारे नागरीकांना त्याचा त्रास होत असतो. त्यामुळे लातूर जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री.अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक श्री. मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीरसींह साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौक थे पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे गांधी चौक येथील अधिकारी/अंमलदार तसेच दंगा नियंत्रण पथकाचे अंमलदार यांचे वतीने नागरीकांचे सुरक्षिततेसाठी तसेच नागरीकांना काही अडचण असल्यास पोलीसांकडुन तात्काळ प्रतिसाद मिळणेसाठी तसेच काही गैरप्रकार होवु नये महिलांची छेडछाड होवु नये या करीता लातूर शहरातील गंजगोलाई, सराफ लाईन, कापड लाईन, भुसार लाईन, भांडी गल्ली, मज्जीद रोड, सुभाष चौक, दयाराम रोड या भागात नियमितपणे पायी पेट्रोलींग करण्यात येत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments