सरकारची यंत्रणा या नराधमाला खरंच शोधून 'शिक्षा करणार का ? आयुष्यभर साथ दिली, अन् मृत्यूही एकत्रच आला ! हातात हात घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध जोडप्याचा भरधाव कारने घेतला जीव..."


लोकनेता न्युज नेटवर्क

परभणी (दत्तात्रय कराळे) :- छत्रपती संभाजीनगरमधली ही दुर्दैवी घटना. वेळ रविवारची संध्याकाळची... ७१ वर्षांचे एक आजोबा आणि ६४ वर्षांची आजी... एकमेकांचा हात घट्ट धरून रस्ता ओलांडत होते. त्यांना वाटलं असावं, आयुष्यभर जशी एकमेकांना साथ दिली, तसाच हा रस्ताही आम्ही सुखरूप पार करू...

...पण एका भरधाव 'काळाने' एका क्षणात सगळं काही संपवलं होतं ! मनाच्या चिंधड्या करुन टाकणारी ही दु:खद घटना परंतु ज्या यमरुपी मानवीय दैत्याने केली, त्यांचं त्याला काहीच वाटलं नसावं, ही सुद्धा शोकांतिकाच म्हणता येईल.

पडेगाव परिसरात एका भरधाव, निष्काळजी कार चालकाने या वृद्ध जोडप्याला इतक्या जोरात उडवलं की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

ही कोणी जी माणसं होती, ती सामान्य तर मुळीच नव्हती, परंतु अगदी सामान्यपणे आपले जीवन जगत होते. एकाहत्तर वर्षीय असलेले रामराव माने हे एक निवृत्त प्राध्यापक होते आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला माने या चौसष्ट वर्षांच्या. त्या एक आदरणीय अशा वकील होत्या. ज्यांनी आयुष्यभर समाज आणि शिक्षणाची सेवा केली, त्यांचा अंत इतका दुर्दैवी व्हावा, हे मन सुन्न करणारं आहे. 

एका क्षणात दोन जीव गेले. एक हसतं-खेळतं, अगदी सोबतीनेच बोलत चालत आदरणीय कुटुंब उद्ध्वस्त झालं. 

याला जबाबदार कोण ? हा फक्त अपघात म्हणायचा, की 'Speed Thrills' म्हणत भरधाव गाडी चालवणाऱ्या विकृतीने केलेला हा खून समजायचा ? शहरांमधल्या या रस्त्यांवर भरधाव गाडी चालवणाऱ्यांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही ? कायद्याचा तर सोडा, परंतु जनाला नाही तर मनाला तरी लाज वाटली जाणे आवश्यक होते. स्वतःचे आई-वडील असते तर त्यांना मदत करण्याऐवजी तो हैवान असंच सोडून पळाला असता का ?      

त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ सोडली नाही आणि मृत्यूनेही त्यांना वेगळं न होऊ देता एकाच क्षणी एकत्र नेलं... पण ज्या 'नराधमा'मुळे जे हे घडलं, त्याला कठोर शिक्षा होणार का ? हा खरा सवाल आहे.    

खरं तर या दाम्पत्याला मी ओळखतही नाही. परंतु जी घटना घडली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. ती कोणाच्याही वाट्याला येऊ नये. एका नामांकित व्यक्तीमत्वांना बोलतं चालतं जीवन एका क्षणात ज्यानं संपवलं, त्याच्या मनाला तरी हे पटलं असेल का ? त्या नराधमाने निश्चितपणे हे प्रायश्चित्त भोगलं पाहिजे, असं कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे.  

संध्याकाळची ऐन गर्दीची वेळ असूनही भरधाव वेगाने गाडी ती गाडी केलीच कशी ? त्यावेळी नेमका वाहतूक पोलीसही घटनास्थळी नसावा, हे पण आश्चर्यकारक असेच म्हणता येईल. का हे घडणार होतं म्हणून कदाचित त्या कर्मचाऱ्यालाही तेव्हाच तेथून निघून जाण्याची बुध्दी सूचली असावी. या सर्व गंभीर बाबी केवळ विचारांचा किस काढणाऱ्या आहेत. परंतु जे काही घडलं, ते मात्र निश्चितपणे मनावर घाव घालणारं घातकी कृत्यं होतं एवढं नक्की..!

त्या आदरणीय दांपत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये, हीच परमेश्वरचरणी विनम्र प्रार्थना करतो.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments