लोकनेता न्यूज नेटवर्क
जिवती (सय्यद शब्बीर जागीरदार) :- बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून साथी पोर्टलवरून बियाण्यांचे वितरण आणि विक्री करणे राज्यातील सर्व बियाणे उत्पादक आणि कृषी निविष्ट विक्रेत्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात पंचायत समिती सभागृह जिवती येथे १५ ऑक्टोबरला कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण तथा साथी पोर्टल फेज-२ चे प्रशिक्षण देण्यात
आले. यावेळी जिल्हा परिषदचे मोहीम अधिकारी एल. ए. कटरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी माधुरी गावडे पंचायत समितीचे कृषी अधिकारी संकेत राजेभोसले , तालुका गुणनियंत्रण अधिकारी शशिकांत पांढरकर , तालुका कृषी निविष्ठा संघटनेचे अध्यक्ष डी के चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणात साथी पोर्टल लॉगीन आणि वापरासंदर्भात प्रोजेक्टरद्वारे माहिती देण्यात आली. साथी पोर्टलमुळे बोगस बियाणे विक्री, साठेबाजी तसेच बियाण्याची जादा दराने विक्री आदी प्रकारांना आळा बसणार आहे. शिवाय यातून शेतकऱ्यांची फसवणूकही होणार नाही. शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनापासून तर बियाणे वितरणा पर्यंतची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण बियाणेही वितरित होणार आहे. रब्बी हंगामात सर्व प्रकारच्या बियाण्यांचे वितरण आणि विक्री केंद्र शासनाने विकसित केलेल्या 'साथी पोर्टल प्रणाली वरूनच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत आग्रह धरावा. यामुळे बोगस बियाणे विक्री, साठेबाजी तसेच बियाण्यांची जादा दराने विक्री आदी प्रकारांना आळा बसणार.
तालुका कृषी अधिकारी, जिवती माधुरी गावडे
साथी पोर्टलचे लॉगिन आयडी व पासवर्ड सर्व बियाणे उत्पादक व निविष्ठा विक्रेते यांना देण्यात आले असून पहिल्या वेळी पोर्टल वरून लॉगीन करावे व प्रोफाईल अद्यावत करावे. तद्नंतर मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करून बियाणे विक्री करता येणार आहे.
पोर्टलवरून बियाणे विक्री केल्यास बियाण्याची उपलब्धता व वितरणाची सद्य स्थिती काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. साथी फेज-२ च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत
कृषी विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये साथी पोर्टल वरून प्रमाणित बियाणे विक्री व वितरण करणे कृषी विभागाने अनिवार्य केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment