पुरग्रस्त महिलांना नासिक येथील सुवर्णकार महिला मंडळ सामाजिक संस्थेचा आधार. दिवाळीच्या तोंडावर एक हात मदतीचा उपक्रम राबवत सर्व पुरग्रस्त महिलांना साड्या वाटप करत दिला आधार. ३०० महिलांना प्रत्येकी दोन साड्याचे वाटप.


लोकनेता न्यूज नेटवर्क

मुक्रामाबाद (दादाराव गुमडे) :- आँगष्ट महिन्याच्या सुरूवातीलाच मुखेड तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने व लेंडी नदीला प्रलयकारी महापुर आला त्यात लेंडी धरणाचे दरवाजे कोंडल्यामुळे रावणगाव गावात पाणी शिरले त्यात दावणीला बांधलेली मुखी जनावरांसह घरातील आहे नाही ते सर्वच जिवनावश्यक वस्तू वाहून गेल्यामुळे पुर्ण गावकऱ्यांचा संसार उघड्यावर पडले. असून दिवाळीच्या तोंडावर या पिडीत कुटुंबाला आधार देण्यासाठी नासिक येथील सुवर्णकार महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई सोनार. यांनी एक हात मदतीचा हा उपक्रम राबवत पुरग्रस्त असलेल्या रावणगाव (ता.मुखेड) येथे बुधवार (ता.१५) रोजी पुरग्रस्त सर्व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

चालत असलेल्या सुखी संसार ऐन दिवाळीच्या तोंडावरच अतिवृष्टी होऊन लेंडी नदीला मध्यराञी प्रचंड महापुर आला त्यात गावातील सर्वच घरे उद्वस्त झाली . कपड्यासह घरातील सर्वच वाहून गेले. दावणीला बांधलेली मुखी जनावरे वाहून गेली. तर काहीचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. सगळ्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले. अशी भयाण परिस्थिती येथील नागरिकांवर आली. अशा परिस्थितीत त्यांना होईल तेवढी मदत करत आपण मानव धर्म पाळला पाहिजे. आपण समाजात वावरत असताना समाज भान ठेवले पाहिजे अशा संकटावेळी मानव मानवाच्या मदतीला येणार नाही तर कोण येणार आहे. बघ्याची भूमिका न घेता अशा संकटकाळी एकमेकांची मदत करून मानवता धर्म पाळला पाहिजे त्यामुळे रावणगाव येथील पुरग्रस्तांची दिवाळीच्या तोंडावर आपल्याने होईल तेवढी त्यांची मदत करावी हा, उद्दात हेतू, डोळ्या समोर ठेवून महाराष्ट्र राज्याचा समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेल्या श्रीमती मीनाताई सोनार, यांनी आपल्या महिला सहकार्यांना सोबत घेऊन मुखेड तालुक्यातील रावणगाव येथील सर्व पिडीत पुरग्रस्त महिलांना एक हात मदीचा उपक्रम राबवत प्रत्येक महिलांना दोन साड्याचे वाटप करत दिवाळीची जणू भेटच देवून आपले सामाजिक कार्य केले आहे. एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष शैलेश उदावंत , सुनील कांजळे, अमित राजगिरे , वैशालीताई कुलथे, ज्योतीताई माळवे ,जयाताई कुलथे, रेखाताई कुलथे,आरतीताई हांडगे, यशोदाताई पर्वतकर, विना भाभी, वैशालीताई आष्टीकर, सचिन सोनार, किसन डहाळे, भैरव लोंढे, यांचे सहकार्य झाले. तर मीनाताई सोनार. यांनी सावळी येथील माजी सरपंच श्रीकांत काळे, खतगावचे सरपंच जयराम बाचे, निरंजनअप्पा गंदिगुंडे कलंबरकर, ग्राम पंचायत सदस्य बालाजी पसरगे, कॉग्रेसचे दिनेशअप्पा आवडके, शांताबाई वागदरीकर शीलाताई डहाळे रुक्मिणी ताई नरवाडे साई डहाळे मयंक डहाळे यांनी दिवाळीच्या तोंडावर येथील सर्व पुरग्रस्त महिलांना साड्याचे वाटप करून मदत केल्याने येथील पुरग्रस्त महिलांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात का होईना आनंदाचे भाव दिसत होते.

संकटकाळी मदत करून मानवता धर्म पाळला पाहिजे.

या प्रलयकारी पुरात घरातील जिवनाश्यक वस्तू व दारात बांधलेली जनावरे वाहून गेली. संसार उघड्यावर येऊन पडला जगायचे कसे असा प्रश्न पडला अशा वेळी आपण मानवतेची साखळी होऊन त्यांची सर्वतोपरी मदत करत त्यांना धीर देत या विनाकारी संकटातून बाहेर काढणे हेच मानवता धर्म आहे. आपण बघ्याची भूमिका न घेता प्रत्येकांनी होईल तेवढी मदत करून मानवता धर्म पाळला पाहिजे.-- श्रीमती मीनाताई सोनार,- सुवर्णकार महिला मंडळ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा . नासिक.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments