देशाचे सरन्यायाधीश यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा मेहकर येथे निषेध - आंबेडकरी चळवळीचे युवा नेते, तथागत ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई



लोकनेता न्युज नेटवर्क 

बुलढाणा (प्रतिनिधी) :- मेहकर येथे आंबेडकरी चळवळीचे युवा नेते तथागत ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई व राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने यांच्या नेतृत्वाखाली मेहकर नायाब तहसीलदार अजय पिंपरकर साहेब यांना निवेदन देत आसे नमुद करण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात देशाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवरचा हल्ला नसून, भारतीय न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर झालेला गंभीर प्रहार आहे. या भ्याड कृत्याचा आम्ही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने तीव्र शब्दांत निषेध करतो. न्यायव्यवस्था हीच लोकशाहीची खरी हमी आहे आणि त्या व्यवस्थेचे सर्वोच्च पद भूषविणार्या व्यक्तीवरच जर अशा प्रकारचा हल्ला झाला, तर तो संपूर्ण राष्ट्रासाठी चिंताजनक आहे. समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा, तसेच न्यायावरचा विश्वास डळमळीत करण्याचा कपटी प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचा परिसर जो देशातील न्यायमंदिर मानला जातो तिथेच अशा प्रकारची घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे. लोकशाहीच्या पाया रचणाऱ्या प्रमुख खांबांमध्ये न्यायव्यवस्था ही सर्वात महत्त्वाची आहे. या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या सरन्यायाधीशांवरच जर हल्ला घडला, तर तो केवळ एखाद्या व्यक्तीवर झालेला आघात नसून, भारतीय संविधान, कायदा आणि लोकशाही व्यवस्थेवरच झालेला थेट प्रहार आहे. असा हल्ला हा न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा डागाळण्याचा सरन्यायाधीशांवर भ्याडपणे हल्ला करणाऱ्यांचा निषेध करणे पुरेसे नाही, तर अशा प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा देणे हे न्यायव्यवस्थेप्रती खरी बांधिलकी ठरेल. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आहे आणि हा संताप स्वाभाविकही आहे. कारण हल्ला म्हणजे देशातील सामान्य माणसाच्या हक्कांवर आणि सुरक्षिततेवर हल्ला होय. समाजाने, माध्यमांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून या प्रकरणात स्पष्ट व ठाम भूमिका घेतली पाहिजे. न्यायालयाची प्रतिष्ठा, संविधानावरील विश्वास आणि लोकशाहीचे रक्षण ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. या घटनेत सामील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी आमची ठाम मागणी आहे. न्यायालयाचे गौरव, प्रतिष्ठा आणि स्वायत्तता यांचे रक्षण करणे हे सर्वसामान्य जनतेचे, माध्यमांचे तसेच शासनाचे सामूहिक कर्तव्य आहे.

यावेळी समस्त आंबेडकरी चळवळ व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments