लोकशाही पत्रकार संघाच्या कार्यालयाचे नवीन जागेत उदघाटन सपन्न पत्रकारांनी सत्याच्या बाजूनी लेखणी चालवावी - नवनाथ अण्णा शिराळे



लोकनेता न्यूज नेटवर्क

बीड (पांडूरंग हराळे) :- लोकशाही पत्रकार संघाच्या कार्यालयाचे नवीन जागेत उदघाटन सपन्न. दैनिक युवती राज संपादक :- बी.बी.वैद्य"लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनेल"मो.90758873288459697328,सौ. शारदा डुलगच (संपादिका: सा. समिकरण वार्ता)

श्री.स.का.पाटेकर (संपादक :- दै. जय गणनायक),श्री. नितेश उपाध्ये (संपादक :- सा. आर्दश पोल खोल),श्री. साजेद सय्यद (उपसंपादक :- दै. माझी सरकार),श्री. अण्णासाहेब साबळे (संपादक : है. जागतिक लोकवार्ता),श्री. संजय कुलकर्णी (उपसंपादक- दै. न्याय टाईम्स),श्री. चंद्र अडागळे (संपादक :- जनजागृत्ती न्युज),श्री. ज्ञानेश्वर बुधवत (संपादक :- दै. लोकनेता)

,श्री. दत्तात्रय हंडीबाग (संपादक :- दै. मराठवाडा दर्शन)

,श्री. बिलाल शेख (संपादक :- दें. विश्वनायक),श्री. आत्माराम वाव्हळ (संपादक - दै. संघर्ष यात्रा),श्री. बालासाहेब फपाळ (संपादक :- सा. विकासनामा),श्री. ईमाददोद्दीन इनामदार (संपादक :- दै.लोक ईच्छा),श्री. शकील शेख (संपादक :- दै. सत्यवार्ता) संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंखे, प्रदेश अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र निलोफर शेख, प्रदेश उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र हलिमा शेख, प्रदेश सचिव गणेश जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब खान, प्रदेश उपाध्यक्ष अनिस कुरेशी, वसीम आजाद यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा संघटक यांनी नियोजन केले होते. या यावेळी अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे पाटील हे होते. तर यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य, मराठवाडा कार्याध्यक्ष आत्माराम वाव्हळ, जेष्ठ पत्रकार कचरे, डिजिटल मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष नितेश उपाध्ये, बीड जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद सिरसाट, बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य बोलताना म्हणाले की, लोकशाही पत्रकार संघ सलग्न विविध 72 विकास समित्या काम करत आहेत. लोकशाही पत्रकार संघातील राज्याभरातील सर्व पदाधिकारी एक दिलाने, तन-मन-धन अर्पण करून काम करत आहेत. राज्यातील सर्व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मी स्वतः राज्यात दौरा करणार आहे. यावेळी सर्व पत्रकारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी भरीव असे काम करणार आहे. शिवाय लवकरच बीड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी नवनाथ अण्णा शिराळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना नवनाथ अण्णा शिराळे म्हणाले की, पत्रकारांनी सत्याच्या बाजूनी लेखणी चालवावी. बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक पत्रकार निर्भीडपणे पत्रकारितेचे काम करत आहेत.

त्यामुळे समाजातील गोरगरीब सामान्य जनतेला न्याय मिळत आहे. बीड जिल्ह्यातील विशेषतः लोकशाही पत्रकार संघाच्या प्रत्येक पत्रकारांनी निर्भीडपणे अन्य अत्याचाराच्या विरोधात आपली लेखणी चालवावी. बीड जिल्ह्यातील लोकशाही पत्रकार संघाच्या प्रत्येक पत्रकारांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. यापुढेही मी आपल्या पाठीशी खंबीर उभा राहीन. प्रत्येकाला माझे सहकार्य राहील असे आश्वासन दिले. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. बीड नगर परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. बीड नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता येणार आहे. डॉ भीमराव आंबेडकर यांची लेख या बीड नगर परिषदेची नगराध्यक्ष होणार आहे. बीड नगर परिषदेवर गेली 40 वर्षापासून क्षीरसागर यांची सत्ता आहे. आता मात्र क्षीरसागर मुक्त बीड नगरपरिषद होणार आहे. आणि या परिवर्तनामध्ये पत्रकारांचा मोठा वाटा असणार आहे असेही नवनाथ अण्णा शिराळे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बीड न. प. मधील भ्रष्टाचाराची माहिती दिली. या निवडणुकीत नगर परिषद आणि व जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची एक हाती सत्ता येणार आहेत. त्यामुळे बीड शहरा पाठोपाठ जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या सुख सोयी आम्ही उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजू अडागळे यांनी केले. तर आभार संजय कुलकर्णी यांनी मानले. या बैठकीला बीड शहरातील लोकशाही पत्रकार संघाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments