लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (स्वामी सोनकांबळे) :- दिनांक 17ऑक्टोबर, 2025 रोजी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू मा.डॉ. इंद्रामणी सर यांच्या प्रेरणेतून व संचालक, कृषि विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या अधिपत्याखाली व कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी, नांदेड-1 यांच्या च्या समन्वयातून शेतकरी - शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रम हा रब्बी हंगाम पिक लागवड तंत्र ज्ञान या विषयावर 68 वा भाग आयोजित करण्यात आला होता,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) कृ. वि. के पोखर्णी यांनी केले.
कृषि विज्ञान केंद्र,पोखर्णी, नांदेड-1 चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख ( उद्यानविद्या तज्ञ),यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले व रब्बी पिक लागवडा मध्ये कोण -कोणती पिके घेतली जातात याविषयी सविस्तर माहिती दिली व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड-1 च्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण,जसे कि कुक्कुटपालन,शेळीपालन, सेंद्रिय निविष्ठा बनवणे,केळीपासून चिप्स बनवणे, आळंबी लागवड इ. चा फायदा शेतकरी बंधू, भागिनी व युवा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले.
यानंतर प्रा. माणिक कल्याणकर ( पीक संरक्षण तज्ञ) यांनी हरभरा पिकामध्ये मर रोग व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांनी चतुसुञी चा अवलंब करावा. ज्यामध्ये मर रोग प्रतिकारक असलेले विद्यापीठाचे संशोधीत वाणाची निवड करावी. एकरी तीन किलो ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा जमिनीतून वापर करावा. बियाणास पेरणीपूर्व रासायनिक व जैविक घटकांची बीज प्रक्रिया करावी याविषयी मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
डॉ. महेश अंबोरे ( पशुवैद्यक तज्ञ) यांनी पशुधन व त्यांची घ्यावयाची काळजी व सौं. अल्का पवळे ( ग्रह विज्ञान तज्ञ) यांनी पोषण आहार व आरोग्य याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच व. ना. म. कृ. वि. परभणी चे डॉ. प्रशांत देशमुख( मुख्य विस्तार अधिकारी) डॉ. कैलास डाखोरे (विद्यापीठ हवामान शास्त्रज्ञ),यांनी आगामी हवामान स्थिती व त्यानुसार पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व. ना. म. कृ. वि. परभणी च्या ज्वार संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. लक्ष्मण जावळे यांनी ज्वार पिका बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले व ज्वारीच्या नवीन वाणाची माहिती दिली जसे कि परभणी सुपर दगडी ज्वार एस पी व्ही -2735, त्यानंतर
कृषि विद्या तज्ञ डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. डी. आर. कांबळे,डॉ. हनुमान गरुड या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना लाभले.तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबेजोगाई, तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्राचे चे शास्त्रज्ञ यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व या ऑनलाईन शेतकरी -शास्त्रज्ञ संवादामध्ये 99 शेतकऱ्यांचा सहभाग होता, या कार्यक्रमासाठी श्री. राकेश वाडीले कृ. वि. के. पोखर्णी यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ) यांनी केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment