कृषी उत्पन्न बाजार समिती,नांदुरा चे सभापती मा.भगवान भाऊ धांडे यांच्या हस्ते अंकिता चोपडे यांचा सत्कार.


लोकनेता न्यूज नेटवर्क

रसूलपूर (कोळंबा) :- येथील रहिवासी असलेले शेतकरी महादेव चोपडे यांची मुलगी अंकिता महादेव चोपडे ही एम.पी.एस.सी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन पुरवठा निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल नांदुरा बाजार समितीचे सभापती माननीय श्री.भगवान भाऊ धांडे तसेच संचालक माननीय श्री वसंतरावजी भोजने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अंकिता चोपडे यांनी अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तसेच एमपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि समाजाचे नाव उज्वल केले आहे.

🌟 त्यांची ही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम हे आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील.

अंकिता चोपडे च्या या यशस्वी प्रवासाने नांदुरा तालुक्यामध्ये अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. असा संदेश सभापती श्री.भगवान भाऊ धांडे यांनी आपल्या संवादातून दिला.

सत्कारावेळी रोशन चोपडे, बळीराम सोळंके, प्रशांत चोपडे, धनराज चोपडे, अविनाश शेले, रामेश्वर वडोडे, शुभम वाघ, यशवंत इंगळे उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments