काशी विश्वनाथ व अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेनिमित्त भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन


लोकनेता न्यूज नेटवर्क

फुलगाव (गौतम पाटोळे) :- श्री. प्रदिपदादा कंद युवा मंच व पै.किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने लोणीकंद - पेरणे जिल्हा परिषद गटातील निरगुडी,वडगांवशिंदे (काकडे) भावडी,श्रीक्षेत्र तुळापूर,लोणीकंद,फुलगाव, वढूखुर्द, पेरणे, बकोरी,डोंगरगाव, बुर्केगाव,पिंपरी सांडस,या गावातील मायबाप जनतेसाठी मोफत काशी विश्वनाथ व अयोध्या देवदर्शन यात्रे निमित्त रविवार दि.२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गोल्डन पॅलेस ( पेरणे टोल नाक्याजवळ) भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पै.किरण संपत साकोरे– पाटील यांनी केले आहे.यात्रेकरू व भाविक भक्तांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली असून संकल्प मेळाव्यासाठी यात्रेकरू भाविकांची नेण्याची बस व्यवस्था प्रत्येक गावातील ग्रामपंचायत चौक येथून केली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments