वाई बाजार येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमजदखाँ हैदरखाँ पठाण यांची निवड


लोकनेता न्यूज नेटवर्क

माहूर (सूरज खोडके) :- माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची नवीन व्यवस्थापक समिती गाठीत करण्यात आली असून यात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमजदखाँ हैदरखाँ पठाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.मागील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर शाळेच्या शैक्षणिक प्रगतीवर देखरेख व विद्यार्थी पटसंख्यावाढीसह गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय राठोड व (वाई बा.)ग्रा.पं. चे सरपंच सीताराम दामा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली गावातील पालक वर्ग बैठक घेऊन शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री अमजदखाँ हैदरखाँ पठाण यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी श्री बालाजी मडावी यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान शिक्षक प्रतिनिधी मिलिंद कंधारे,शिक्षक मुन्नेश्वर थोरात, समिती सदस्य संजय दत्तात्रय भुरे,शेख अफसर शेख नबी,छंदक वाठोरे,मोहसीन खान मजीद खान,अविनाश वसंतराव बोथलिंगे,अंजुम शेख जावेद,नाजमीन जावेद खान,नसरीन परवीन सय्यद मोबिन,वर्षा गंगाराम मडावी यांच्यासह शेख अन्नू,युसूफ अकबानी,शेख जावेद शेख हाफिज,अमन पठाण,जावेद खान,मल्हारी कलाने, मोबिन सय्यद,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments