लोकनेता न्यूज नेटवर्क
निलंगा (इस्माईल शेख) :- लातूर: सर्वोत्तम सोशल टीम लातूर यांच्यावतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दीपावली फराळ वाटून दीपावलीची पहाट वंचितांच्या पालावर जाऊन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आली.
पालावर राहणाऱ्या ज्यांच्या घराला दार नाही, ज्यांच्या घरात कधी दिवा लागत नाही तिथे कसला आला दीपोत्सव. अशा गरजू लोकांसोबत सोशल ची स्पेशल दखलपात्र दीपावली साजरी करण्यात आली.लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सर्वोत्तम सोशल टीमच्या वतीने दीपावली फराळ, साबण, शाम्पू, खोबऱ्याचं तेल, अभ्यंगस्नान किट , कपडे इत्यादी साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात दीपावलीची पहाट पालावरती साजरा करण्यात आली.
सर्वोत्तम सोशल टीम लातूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास अंबाजोगाई डायट प्राचार्य भागीरथी गिरी,लोहारा येथील गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिरादार, निलंगा येथील सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुरेश बिरादार, राज्य पुरस्कार प्राप्त डॉक्टर शशिकांत पुरी, संघाचे विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे, ओबीसी चे राज्य सरचिटणीस विजयकुमार पिनाटे, सोशल टीमचे अध्यक्ष उत्तम शेळके,विजयकुमार आडे , परमेश्वर शिरुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मागील पंधरा वर्षापासून सोशल टीम सातत्याने असे समाज उपयोगी उपयुक्त उपक्रम वर्षभर राबवत असते याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश नागलगावे, गोपीचंद बर्डे, सचिन सावळकर, शिवाजी पांढरे, योगेश सांडूर, राजकुमार अग्रवाल, सिद्रामप्पा चाकोते,संजय गायकवाड,सोमनाथ घटकार,प्रल्हाद ढवळे, विजयकुमार कोरे,रामदास अनंतवार, प्रदीप ढेकरे, सुमित नागलगावे ,श्रीनिवास नागलगावे ,रंजना जगताप, जीवनकला जाधव, रंजना चव्हाण, सविता मठपती,तृप्ती अंदुरे, ज्योती जगदाळे, सीमा देशमुख, सुनिता राठोड,सविता पांढरे, सावित्री रायपले, हिरा हेंडगे, वनमाला मसलकर , शोभा पाटील,पुष्पा टिके. यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment