शिराढोण ते कपिलाधार पदयात्रेचे रोप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण.


लोकनेता न्युज नेटवर्क

शिराढोण (लक्ष्मण पाडागळे) :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण ते श्रीक्षेत्र कपिलधार पायी यात्रेस दि.27ऑक्टोबर रोजी शिवमंदिर शिराढोण येथून गाव प्रदक्षिणा घालून शिराढोण ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिंडी प्रमुख राचेप्पा स्वामी यांचा सन्मान,सत्कार करून दिंडीतील पायी यात्रेकरुस शुभेच्छा दिल्या.राचेप्पा स्वामी महाराज यांच्या नेतृवाखाली गेली 25वर्षांपासून श्रीक्षेत्र कपिलधार येथे पायी दिंडी जात असून यावर्षी या पदयात्रेचे रोप्यमहोत्सवी वर्ष असून यावेळी दिंडी प्रमुख राचेप्पा स्वामी यांच्या हस्ते अनेक प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून आशिर्वाद दिला. 

यापद यात्रेत अनेक महिला, पुरुष, बाळ-गोपाळ सहभागी झाले आहेत या पदयात्रेचा पहिला मुक्काम -कलंबर, दुसरा लोहा,तिसरा पालम, चौथा गंगाखेड, पाचवा परळी, सहावा सिरसाळ, सातवा तेलगाव, आठवा मैदा तांडा, नववा पाली ते कपिलधार येथे दिंडीचे प्रस्थान दि.05नोव्हेंबर रोजी सकाळी 10वाजता श्रीक्षेत्र कपिलधार येथे पोहोचेल. असे दिंडी प्रमुख राचेप्पा स्वामी यांनी सांगितले. यावेळी शिराढोण चे सरपंच खुशाल पाटील पांडागळे, व्यंकटराव पांडागळे मालीपाटील, भगवान पाटील कपाळे,तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे, गणपतराव आप्पा देवणे, ग्रामविकास अधिकारी भीमाशंकर मुंजाळ,ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार देवणे, प्रकाश चौडम, सदाशिव भुरे,पत्रकार तसेच गावातील भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments