येळेगाव पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश पाटील क्षीरसागर निवडणूक लढवणार...


लोकनेता न्युज नेटवर्क

अर्धापूर (आनंदराव मोरे) :- अर्धापूर तालुक्यातील पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रमेश पाटील क्षीरसागर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली अर्धापूर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण साठी राखीव असल्याने येळेगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण साठी आरक्षित असल्याने या गणाकडे तालुक्याचे लक्ष लागले असून या गणातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून शिवसेना शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश पाटील क्षीरसागर हे निवडणूक लढविणार असून या गणात येळगाव, बारसगाव, खैरगाव, आमदाबाद ,अमराबाद तांडा, आंबेगाव ,पाटनुर चेनापूर, बेलसर, शहापूर, बोरगड वाडी, आदी गाव असून मागील जिल्हा परिषद निवडणूक जिल्हाप्रमुख बबनराव बारसे येळेगाव पंचायत समिती गणातून अशोक कपाटे हे दोघे विजयी झाले होते या गणात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा असून जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांचे वर्चस्व या गटात आहे त्यामुळे येळेगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार आणि जिंकणार असा विश्वास येळेगाव पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार रमेश पाटील क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments