राष्ट्रीय पातळीवरील यश सप्तगिरी पोदार लर्न स्कूलच्या शिरपेचात गौरवशाली मानाचा तुरा !


लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर (लक्ष्मी मनधरणे) :- दि. 15 आक्टोंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील पुलमेन हॉटेल, एयरोसिटी मध्ये Education World India School Ranking (EWISR) 2025-26 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या संस्थेची स्थापना 2007 साली झाली असून त्यांनी भारतातील शालेय शिक्षणातील उत्कृष्टतेचे मूल्यांकन करून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे परीक्षण करण्याचे कार्य सुरू केले.

२०२५ -२६ वर्षीच्या संस्थेने 14 निकषांच्या आधारे देशभरातील शाळांचे मूल्यांकन केले आणि त्यांपैकी सर्वोत्तम शाळांना सन्मानित केले.

EWISR चे मूल्यांकन व पुरस्कार प्रणाली भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिध्द आहे. या सर्वेक्षणात त्यांनी शाळा, सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स आणि विविध स्त्रोतांमधून माहिती गोळा करून शिक्षणपध्दती आणि शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता पडताळली. एकूण 14221 प्रतिसादक, ज्यात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यांचा समावेश होतो यांच्याकडून माहिती गोळा करण्यात आली त्यावेळी देशभरातील 4000 शाळांचे मूल्यांकन करण्यात आले असून 

14 मूल्यांकन निकष पुढील प्रमाणे -

1. शिक्षक कल्यान व विकास (100)

2. शिक्षकांची क्षमता (200)

3. अभ्यासक्रम व अध्यापन पध्दती (संकर शिक्षणाची तयारी) (100)

4. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष (100)

5. शैक्षणिक प्रतिष्ठा (100)

6. क्रीडा शिक्षण (100)

7. सहशालेय शिक्षण व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन (100)

8. नेतृत्व / व्यवस्थापन गुणवत्ता (100)

9. पालकांचा सहभाग (100)

10. पायाभूत सुविधांची उपलब्धता (100)

11. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण (100)

12. पैशांचे मूल्य (Value for money) (100)

13. मानसिक व भावनिक कल्याण सेवा (100)

14. सामाजिक सेवा (Community Service) (100)

 यावर्षी नांदेड जिल्ह्यातील सप्तगिरी पोदार लर्न स्कूल, देगलूर या विद्यालयाला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख प्राप्त झाली आहे. Education World संस्थेच्या सखोल परीक्षण, मूल्यांकन आणि पारदर्शक प्रक्रीयेनंतर, शाळेला संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून दूसरे स्थान प्राप्त झाले आहे.

या ऐतिहासिक यशाच्या प्रसंगी, सप्तगिरी पोद्दारला स्कूल परिवाराच्या वतीने सर्व विद्यमान मुख्याध्यापक व शिक्षक, तसेच माजी मुख्याध्यापक व शिक्षक सर्व कर्मचारी, तसेच प्रिय विद्यार्थी, पालक व सर्व सहकार्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सप्तगिरी पोतदार लोन स्कूल देगलूर यांनी सर्वांनी दाखवलेला विश्वास, सहकार्य आणि सातत्यपूर्ण समर्थन यामुळेच हे यश संपादन करता येते.

या यशाबद्यल संस्थेचे संचालक डॉ. दिनेश प्रतापवार, डॉ. संजय जवळगेकर, डॉ. नामदेव भुरे, डॉ. अविनाश घोडके, डॉ. धनंजय मसलगेकर, डॉ. कपील एकलारे, डॉ. सौ. योगेश्वरी विजय मिसाळे व शाळेचे प्राचार्य डॉ. अभिनव शुक्ला, उपप्राचार्य महेश बरे तसेच सप्तगिरीपोदार जंम्बो कीड्सच्या मुख्याध्यापीका सौ. रिंपल रत्ती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे खूप खूप अभिनंद आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments