नांदेड (स्वाती सोनकांबळे):- मानवाच्या गुड लाईफ च्या हव्यासापोटी खूप मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत आहे. वेगवेगळ्या कारणाने कार्बन वातावरणात आल्यानंतर तो हरितगृह वायु बनतो. हरितगृह वायू पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या उष्णतेला पकडून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान वाढते. या वाढलेल्या तापमानामुळे मानवी जीवन संकटात आले आहे. वाढीव तापमानाने दररोज शेकडो प्रजाती नष्ट होत आहेत. रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे नदी नाले ओहळ परिसंस्था नष्ट झाल्या आहेत.
जंगल तोडीमुळे जंगलातील अन्नसाखळ्या संपुष्टात येत आहेत. या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे कार्बन उत्सर्जन थांबवणे.कार्बन उत्सर्जन थांबले तरच पृथ्वी वाचेल.अशा प्रकारचे विचार माजी आमदार माननीय अमिताताई चव्हाण यांनी इंदिरा गांधी हायस्कूल येथील मागील वर्षात तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या संकलनाच्या अवलोकन प्रसंगी सांगितले.
इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील उपक्रमशील शिक्षक व पर्यावरण कवी एम.टी. कदम यांनी 2024-25 मध्ये शाळेत अनेक पर्यावरण पूरक उपक्रम घेतले व त्याचे स्पायरल बुक तयार करून माननीय आमदार अमिता भाभी यांना भेट दिले. हे उपक्रम घेण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ. हिप्परगेकर व श्रीमती खंदारे यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक रमेशजी सज्जन व सावित्रीबाई फुलेचे कर्मचारी हिरामण साखरे उपस्थित होते.
शाळेत विविध पर्यावरण पूरक उपक्रम घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. शिंदे यांनी प्रेरणा व मोलाचे सहकार्य केले.
इंदिरा गांधी हायस्कूलच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------------------------------------------------
🪀सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment