लोकनेता न्यूज नेटवर्क
वाशिम (रमेश पडवळ) :- तेंग सुडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पिंपळनेर धुळे येथे राज्यस्तरीय तेंग सुडो स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला येथील वेदांत नवघरे या विद्यार्थ्यांने स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त करून मेडल पटकावले व राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.तसेच स्वराज धोटे, विशाल घाटोळे,समर्थ देशमुख यांनी ब्राँझ मिडल मिळवले व अतुल लोखंडे व यश सावळे यांनी राज्यस्तरावर सहभाग नोंदविला .
संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव ठाकरे माजी राज्यमंत्री सचिव चंद्रकांत ठाकरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम यांनी विजयी संघाचे खेळाडू कोच यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य सी एम ठाकरे उपप्राचार्य एस बी चव्हाण,उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक पी व्ही पवळ तथा तेंग सुडो खेळाचे प्रशिक्षक रमेश रावसिंग पडवाळ व आश्विन चांदणे,आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.असे प्रसिद्धी विभाग प्रमुख आर आर पडवाळ यांनी कळविले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment