सततच्या नापिकी,व अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसाना मुळे पोटा बु येथील सदन शेतकरी अशोक बालाजी माने यांनी आपली जीवन यात्रा संपवली...


लोकनेता न्युज नेटवर्क

हिमायतनगर (विनोद चंदनवार) :- पोटा बु येथील सदन शेतकरी अशोक बालाजी माने हे आपली 1.5 एकर शेती करत करत दुसऱ्या च्या शेतात शेतमजूरीचे काम करून त्यातुन आपला संसाराचा गाडा चालवत होते, परंतु या वर्षी अतिवृष्टी झाली त्या मुळे त्यांचं बऱ्याच प्रमानातं नुकसान झाले असून त्या मुळे त्यांचे मनोबल खचले. सावकारी कर्ज घरचा खर्च, मुलांचे शिक्षण कस भगवता येईल या गोष्टी चा विचार डोकयात ठेऊन त्यांनी शेवटचा पाऊल उचला. हिमायतनगर येथील खडकी रोड येथे औषध प्राशन करून स्वतःची जीवन यात्रा संपवली त्यांच्या नंतर 2 मुले पत्नी, आई, असा परिवार. घरातील कर्ता पुरुष गेल्या मुळे शासनाकडून व स्थानिक आमदार साहेब यांच्या कडून त्यांच्या परिवारास तात्काळ काही मदत मिळून दयावी ही सर्व गावकरी मंडळी कडून बोलल्या जातं आहे.

 ------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments