आगामी नगर परिषद निवडणुक स्वबळावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी: आबीद अली


लोकनेता न्यूज नेटवर्क

जिवती (सय्यद शब्बीर जागीरदार) :- कोरपना: चन्द्रपूर जिल्हयातील राजुरा विधान सभा क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रातील राजुरा व गडचांदूर नगरपरिषद दिवाळीच्या रणधुमाळीत निवडणूकीचे सर्वपक्षाकडून हालचालीना वेग आला असून सर्व पक्षच कामाला लागल्याचे चित्र असून हवसे गवसे गुडघ्याला बांशीग बाधून यावेळी राहणाराच असे असले तरी गडचांदूर व राजुरा या नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ असून यापूर्वी सत्तेत भागीदार होते गडचांदूर नगरपरिषदेत नगरध्यक्ष आपलाच बसावा यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने शरद जोगी यांच्या नेत्तुत्वात नगरसेवक व अध्यक्षपदाससाठी उमेदवार चयन करण्यासाठी वार्ड वार्डनिहाय बैठका घेत तयारीला लागले आहे राजुरा नगरपरीषद मध्ये ३०वर्षा नंतर सर्वसाधारण नगरअध्यक्ष निवडायचा असल्याने अल्पसंख्यांक युवक उमेदवाराला संधी देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरू आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती महिला इतर मागासवर्गीय नगरसेवक उमेदवाराची चाचपणणी सुरुवात झाली असून प्रदेश सहसचिवआबिद अली यांनी दोन्ही नगरपरिषदच्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यास तयारीने लागा व नियोजनबद्ध तयारी करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री इंद्रनील नाईक चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक राजेंद्रजी जैन तसेच जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर यांच्याशी चर्चा करून दीपावली नंतर राजुरा व गडचांदूर येथे संपर्क मंत्राच्या उपस्थितीत निवडणुकीचे तथा उमेदवार निवडी बाबत कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेऊन आगामी राजुरा गडचांदूर नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची सुतोवाच कार्यकर्त्यांना दिले यामुळे दोन्ही नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहणार असून कार्यकर्त्यांनी सर्व जाती धर्म तसेच युवकांना संधी देण्यासाठी उमेदवारांची चाचपणी करावी असेही सांगितले त्यामुळे भाजप काँग्रेस शेतकरी संघटना त्याचबरोबर राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यामुळे निवडणुकीचे गणित बिघडण्याची जाणकारांनी मत व्यक्त केले आहे यामुळे दोन्ही ठिकाणी तिरंगी चौरंगी लढतीचे वातावरण निर्माण होत असून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव सर्वांकडून सुरुवात झालेली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments