लोकनेता न्युज नेटवर्क
कंधार (अविनाश कदम ) :- सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढ्यात अखंड झटणारे नितीन पाटील कोकाटे यांची तिसऱ्यांदा संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.नितीन कोकाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून, त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात व शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले आहे. मराठा आरक्षण लढ्यात काम केले आहे. विविध जनआंदोलनांमधून त्यांनी तरुणांची एकजूट घडवून आणली आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत कार्य पोहोचवले.त्यांच्या नियोजनात तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, रक्तदान शिबीर, बळीराजा महोत्सव, शेतकरी मेळावा आणि युवकांना प्रेरित करणारे सामाजिक कार्यक्रम यांचा यात समावेश आहे. या सर्व उपक्रमांमुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्याचा विस्तार ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे.नव्या जबाबदारीनंतर नितीन कोकाटे यांना अनेकांनी शूभेच्छा देत अभिनंदन केले “संभाजी ब्रिगेडचे कार्य हे समाज जागृती, शिक्षण आणि संघटन या तीन स्तंभांवर आधारित आहे. आगामी काळात आपण अधिक संघटित पद्धतीने सामाजिक प्रश्नांवर काम करू. यावेळी संपर्कप्रमुख गजानन भोयर लातूर संपर्कप्रमुख विभागीय अध्यक्ष संकेत पाटील लोकसभा अध्यक्ष त्रंबकेश्वर पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे जिजाऊ पाटील शिंदे कमलेश कदम व सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती निवड झाली निवडीबद्दल अभिनंदन करत,पुढील . वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment