लोकनेता न्युज नेटवर्क
किनगाव राजा (महेश मुंढे) :- गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमावर चर्चेचा विषय ठरलेल्या प्रकरणात अखेर चौकशी अंति पवन प्रल्हाद जायभाये याच्यावर किनगाव राजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. समाज माध्यमावर आत्महत्येचा बनाव करत ठाणेदार किनगाव राजा पोलीस ठाणे व सरकारी फिर्यादी यांचे बद्दल खोट्या अफवा पसरवून पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारतर्फे फिर्यादी यांनी दिनांक 27- 10 -2025 रोजी 11:30 च्या सुमारास शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू नये या उद्देशाने आरोपी पवन प्रल्हाद जायभाये याने ठाणेदार किनगाव राजा व बैलजोडी चोरणारे शेतकरी हे माझ्या मृत्यूस कारणीभूत असतील असे बोलून कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा बनाव केला व व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमावर प्रसारित केला होता. आरोपी पवन प्रल्हाद जायभाये याचा जबाब घेण्यासाठी सरकारतर्फे फिर्यादी पो. कॉ. सुभाष प्रकाश गीते व पो. का. शिवाजी बारगजे हे गेले असता परत आरोपी पवन प्रल्हाद जायभाये याने त्याच्या स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ चित्रण सुरू करून त्यामध्ये फिर्यादी व त्याचे सोबत अजून दोन जण असे तिघांनी माझ्या घरी येऊन धमकी दिली की ठाणेदार साहेबांविरोधात जर तू जबाब दिला तर तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू असे बोलला व व्हिडिओ चित्रण समाज माध्यमांवर प्रसारित केले. सरकारतर्फे फिर्यादी कायदेशीररित्या त्याचा जबाब नोंदवण्यासाठी गेले असता त्यांना जबाब न देता सरकारी फिर्यादींचा बनावट व्हिडिओ चित्रित करून पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होणे व अप्रतिची भावना पसरविण्याचे काम केले आहे. सरकारतर्फे फिर्यादी यांच्या लेखी रिपोर्ट वरून अपराध नंबर 270 / 2025 कलम 3 पोलीस ( अप्रतिची भावना चेतवणे ) अधिनियम 1922 अन्वये नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार साहेबांच्या आदेशाने तपास बीट पो.हे.का. विष्णू मुंडे ब.नं. 1245 यांच्याकडे देण्यात आला आहे.
सदर कारवाई मुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नाटकीय विडिओ चित्रित करून समाज माध्यमावर प्रसारित करण्याच्या धमक्या देणाऱ्या गावगुंडानवरवचक बसेल अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment