गोंडपिंपरी पोलिसांकडून बनावट अवैध दारू साठ्याचा पर्दाफाश आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.


लोकनेता न्यूज नेटवर्क

जिवती (सय्यद शब्बीर जागीरदार) :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,पोलिस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सुरु केलेल्या विशेष तपास मोहिमेत शुक्रवारी दि.(१७) गोंडपिंपरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बनावट अवैध दारू साठा जप्त केला आहे.ही कारवाई गडचिरोली जिल्ह्याकडे जाणाऱ्या गोंडपिपरी आष्टी मार्गावर पोलीस स्टेशनच्या समोर करण्यात आली.

ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक चारचाकी वाहन गोंडपिंपरी मार्गे गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार हत्तीगोटे,वंदिराम पाल,प्रशांत नैताम,अतुल तोडासे,तिरुपती गोडसेलवार यांनी तात्काळ सापळा रचून रात्री ११ वाजता एम एच ३० के एफ ४६५६ चारचाकी स्कॉर्पिओ वाहन अडवले.तपासणी दरम्यान वाहनामध्ये ५१ देशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला.एकूण १२ लाख रुपये किमतीच्या दारूसाठ्यासह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.पोलिसांनी वाहन अडवताना गाडीतून उडी मारून चालक पसार झाला.

सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments