वैज्ञानिक दृष्टिकोन, मैत्री व करुणेचे बुद्ध तत्त्वज्ञानच जगात शांती स्थापन करू शकते.... पूज्ज भन्ते धम्मशील थेरो धम्मदीप बुद्ध विहार येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न


लोकनेता न्युज नेटवर्क

बीड (प्रतिनिधी) :- आपला भारत देश जगात बुद्ध भूमी म्हणून ओळखला जातो. सुमारे २५०० वर्षांपूर्वी जगात दुःख आहे व दुःखाला कारण आहे हे शोधण्याकरिता राजमहाल सोडणारे सिद्धार्थ यांना सम्यक संबोधी प्राप्त झाल्यानंतर तथागत गौतम बुद्ध म्हणून ओळखल्या जाऊ लागले तथागत गौतम बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रज्ञा, मैत्री,शील,करुणेचे तत्त्वज्ञानच जगात शांती स्थापित करू शकते असे पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांनी धम्मदीप बुद्ध विहार बलभीम नगर पालवण रोड बीड येथे 2 ऱ्या वर्षावास धम्मग्रंथ वाचन समापन प्रसंगी आपल्या मधुर वाणीने मंत्रमुग्ध करणाऱ्या धम्मदेसने प्रसंगी प्रतिपादन केले. कार्यक्रमास श्रामनेर भिक्खू धम्मबोधी व धम्मरक्षिता अनागरिका तसेच महामानवा अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले वाचाल तर वाचाल चे अध्यक्ष डी.जी वानखेडे, ॲड राजेश शिंदे, ॲड डी एस. तांगडे, समाजसेवा प्रशांतजी वासनिक, परमेश्वर बनकर, भास्कर सरपते, जेष्ठ पत्रकार, सुनीलजी डोंगरे पत्रकार सौंदर्मल, यांची प्रमुख उपस्थिती होती.

वर्षावास व बुद्ध आणि त्त्यांचा धम्मग्रंथ वाचन समापन प्रसंगी पूज्ज भंतेजी च्या उपस्थितीत धम्मरॅली काढून आदर्शाची पुष्प दीप धुपाने पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. पूज्ज भन्तिजींना पुष्प पुष्पगुच्छ देऊन विहार महिला कमिटी तर्फे सत्कार करून त्रिवार वंदन करण्यात आले. पूज्य भन्तिजींनी त्रिसरण पंचशील दिले. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे नियमित वाचन करणाऱ्या व विहरात उपस्थित राहणाऱ्या महिलांना "वाचाल तर वाचाल" तर्फे भंतेजीच्या हस्ते , "त्रिसरण पंचशील हाच जीवन मार्ग" या पुस्तकांचे वितरण करून सत्कार करण्यात आला.

 आपल्या देसनेत पुढे भन्तिजी म्हणाले की लहानपणापासून डॉ. बाबासाहेबाना शिक्षणाकरता, पाण्याकरिता बडोदा संस्थांनात नोकरी करीत असताना घराकरिता सोसलेल्या अमानवीय अपमान व विषमतेची वागणूक कशी दूर करता येईल व माणसाला माणसासारखे स्वाभिमानाने कसे जगता हा बदल करण्याकरता 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली व जगातील सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला. जगात मानवाचे कल्याण साधणारा तथागतांचा मानवाच्या कल्याणाकरिता दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणारा दाखविणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा सम्राट अशोका विजया दशमी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षा प्रथम स्वतः घेऊन उपस्थित पाच लाख अनुयायांना धम्मदीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ केवळ वर्षावासामध्येच न वाचता प्रत्येकाने नेहमी-नेहमी त्याचे वाचन करून त्यातील तथागतांचा उपदेश समजुन घेणे किती महत्त्वाचे आहे, त्या बरोबरच बुद्ध धम्म हा केवळ पूजा पाठाचा धम्म नसून तथागतांच्या महान उपदेशाचे जीवनात आचरण केल्यानेच कसे मंगल होणार आहे असे अनेक उदाहरणाद्वारे उपस्थिताना समजावून सांगितले. ह्याप्रसंगी प्रशांत वासनिक व परमेश्वर बनकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून धम्म धारणेची व तसे वागण्या चे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम राऊत यांनी केले तर प्रास्ताविक ॲड तेजस वडमारे यांनी केले व आभार प्रदर्शन अंजली तेजस वडमारे यांनी व्यक्त केले.समापन कार्यक्रमास बलभीम नगर पंचशील नगर मित्र नगर परिसरातील सरिता खेमाडे, अर्चना जाधव, कोमल वाघमारे, उर्मिला वडमारे,कू.किरण वडमारे, आशा धन्वे,सविता डोळस, अभिलाषा ओव्हाळ, जयश्री वडमारे,पंचफुला वाघमारे, इजूबाई अंकुटे, छाया जोगदंड, रमाबाई सोनवणे, आशाबाई भालेराव, आचल वडमारे, शकुंतला ससाणे, मालन अंकुटे, फुलामाय इंगळे, साखरबाई वाघमारे, हौसाबाई वाघमारे, संगीता जाधव, शिवकन्या खेमाडे, कुसम साळवे, शिला साळवे, व विशाल वडमारे, राजू धन्वे, एस एस सोनवणे, बी.जी दळवी आर्यन खेमाडे, आदर्श खेमाडे व बहुसंख्य उपासक उपासिकां बालक बालिका उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सिद्धार्थ वडमारे, राज जाधव, गौतम खेमाडे, आर्यन साळवे, प्रेम जोगदंड, ज्ञानेश्वर इंगळे यांनी बहुमोल परिश्रम घेतले सरणात्तयने आणि भोजन व खीरदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments