किनगाव राजा पोलिसांची धडक कारवाई कारवाई,गोवंशाचे मास विक्री प्रकरण उघड, एकास अटक.. ठाणेदार मा. संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई..



लोकनेता न्यूज नेटवर्क

किनगाव राजा (महेश मुंढे) :- सविस्तर वृत्त असे की किनगाव राजा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत गोवंशाचे मास बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एका इसमास रंगेहात पकडले,

या कारवाईने बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई मा. संजय मातोंडकर ठाणेदार पोलीस ठाणे किनगाव राजा यांच्या थेट मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी 10 वाजता करण्यात आली, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने छापा टाकला असता आरोपी सय्यद हमजा सय्यद चांद वय 42 वर्ष राहणार कालाकोट सिंदखेड राजा ता. सिंदखेड राजा जि.बुलढाणा हा गुप्तपणे गोवंशाचे मांस विक्री करताना आढळून आला, कारवाईदरम्यान पोलिसांनी गोवंश मास, वजन काटा, मोटरसायकल व इतर साधने असा एकूण रुपये 22,850/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

याप्रकरणी आरोपी सय्यद हमजा सय्यद चांद याच्या विरुद्ध कलम 271 भा. न्या. सं. सह कलम 5 (क ), 9(अ )महा. प्राणी संरक्षण अधी. व कलम 3/181,130/177 मो. वा. का. प्रमाणे गुन्हा दाखल केला असून मा. ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो..का. शरद म्हस्के म्हस्के यांचे फिर्यादीवरून पोलीस हे.कॉ. अनिल नागरे ब. नं. 161 यांच्याकडे देण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस ठाणे किनगाव राजा व त्यांच्या पोलीस पथकाने प्रभावी सहभाग घेत कारवाई केली.

या कारवाईदरम्यान बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक शुभम राजेश पटमासे राहणार देऊळगाव राजा यांनी कौतुकास्पद सहभाग घेतला होता.

या धडक कारवाईनंतर बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये  

भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे मोठे कौतुक होत आहे, व ठाणेदार मा. संजय मातोंडकर यांच्या तत्परतेमुळे परिसरात कायद्याचा धाक अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments