लोकनेता न्यूज नेटवर्क
सेनगाव (महादेव हरण) :- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ४० प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबीत असल्याने ते प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजुर करण्यात यावे यासाठी हिंगोली विधानसभेचे आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी दि.१५ आँक्टोबर बुधवार रोजी मुंबई येथे जाऊन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची भेट घेत पत्र दिले.
हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत ४० प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबबीत आहेत.तसेच दि.२८ आँगस्ट २०२५ च्या ३१ व्या Pac च्या सभेत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अनुदान देण्यातबाबत निर्णय झाला आहे. परंतु अद्याप पर्यंत अनुदान वितरीत केलेले नाही.तसेच पुर्वी दोन टप्प्यात अनुदान देण्यात येत होते ते आता बंद करुन दोन टप्प्यात देण्यात येत आहेत या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत आले आहेत.दोन टप्प्यात अनुदान दिल्यास प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना मदत होईल म्हणुन याप्रकरणी केंद्र शासनाकडे शिफारस करुन प्रलंबबीत प्रस्ताव मंजुर करण्याबाबत व दोन टप्प्यात अनुदान देण्याबाबत आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांची मुंबईत जाऊन भेट घेत त्या विषयी पत्र दिले.यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केंद्र सरकारच्या पशुधन संवर्धन विभागास पत्रव्यवहार केला व सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्न करु असा शब्द दिला.यावेळी आ.तान्हाजीराव मुटकुळे यांच्या सोबत माजी सभापती अशोकराव ठेंगल,नारायण खेडेकर,एम.डी.इंगोले,संतोष टेकाळे उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment