सरसम, बीट अंतर्गत वनविभागाच्या कामात गैरव्यवहार, वनपाल विभुतेसह त्यांच्या सहकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची राऊत यांची मागणी


लोकनेता न्युज नेटवर्क 

हिमायतनगर (प्रतिनिधी) :- हिमायतनगर वनपरिक्षेत्र अतर्गत येणाऱ्या सरसम व पोटा, दुधड वाळकेवाडी बीटमध्ये नियमांना धाब्यावर बसवून झाडांची लागवड करण्यात आली असून त्या झाडांची लागवड मजुरांकडून न करता चक्क जेसीबी मशिनच्या सहाय्याने खड्डे खोदून करण्यात आली आहे. झाडांची लागवड करत असताना अनेक झाडांच्या रोपांचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्यावर जाळी बसविण्यात आलेली नाही. मातीचे तळे निकष्ट दर्जाचे बनवल्याने ते वाहून गेले. ही सर्व कामे जेसीबीद्वारे केल्याने वनमजुरांच्या पायांवर हातोडा मारून जेसीबी मालकाच्या घशात गरीब वनमजुरांचा घास सरसम बीटचे वनपाल विभुते, वनरक्षक सोने, पोटा बीटचे वनपाल मिटकरे, वनरक्षक विजापुरे यांनी घातला आहे. या अधिकाऱ्यांनी स्वता:चा  व जेसिबी मालकाचा फायदा व्हावा या उद्देशाने तेथील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे. ही सर्व कामे सन २०२४ ते सन २०२५ मध्ये करण्यात आली आहेत. तसेच अनेक झाडांची कत्तलही करण्यात आली आहे. 

 सदर प्रकरणातील जेसीबीद्वारे झालेल्या सर्व कामाची सखोल चौकशी करून व्हीडीओग्राफी करण्यात यानी.  तसेच जंगलात आणलेल्या दोन्ही जेसीबी शासनाने ताब्यात घेऊन कार्यवाही करावी. त्याचबरोबर सरसम बीटच्या वनपाल विभुते, वनरक्षक सोने, पोटा बीटचे वनपाल मिटकरे , वनरक्षक विजापुरे यांच्यावरही  तात्काळ कार्यवाही करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा राजकुमार राऊत माननी उपवनसंरक्षक अधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments