सर्प दंश झाल्या मुळे मुरा म्हैस दगावली शेतकऱ्यांचे ...एक लाख वीस हजार रुपयांचे नुकसान....


लोकनेता न्युज नेटवर्क

लोहा (संतोष पाटील जाधव) :- सर्प दंश झाल्याने बेटसांगवी ता.लोहा जि.नांदेड येथील शेतकरी उध्दव गणाजी सवराते मुरा म्हैस दगावली असून शेतकऱ्यांचे एक लाख विस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकऱ्यांने पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्वरित पंचनामा करून मला सहकार्य करावे अशी विनंती केली असता.पशुवैद्यकिय अधिकारी म्हणाले सर्प दंश नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापन मध्ये येत नाही त्यामुळे अनुदान मिळत नाही प्रायव्हेट विमा कवच असल्यास शवविच्छेदनानंतर 

अहवाल केल्याचा लाभ मिळू शकतो असे त्यांनी शेतकऱ्याला सांगितले. तलाठी यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा तेच कारण देत आर्थिक नुकसान मिळू शकत नसल्याचे सांगितले. तेव्हा शेतकऱ्यांनी आमदार खासदार जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

 ------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments