सिद्धार्थ पल्लवी प्रशांत काळेचा जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत डबल गोल्ड विजय

लोकनेता न्युज नेटवर्क

कोल्हापूर (भगवान निगवेकर) :- कोल्हापूर, १२ ऑक्टोबर :- ललित गांधी जैन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आणि स्वराज्य रोलर स्केटिंग अकॅडमी, कोल्हापूरचा सदस्य सिद्धार्थ काळे याने बेलगाव येथे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत उत्तम कामगिरी करत २०० मी. आणि ४०० मी. या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

या उल्लेखनीय यशामुळे सिद्धार्थची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात बेंगळुरू येथे पार पडणार आहे.

सिद्धार्थने हे यश आपल्या प्रशिक्षिका शुभांगी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवले आहे. त्याच्या मेहनतीने आणि चिकाटीने शाळा व अकॅडमीचा अभिमान वाढवला आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments