३५ लाखांचा अपहार झालेला माल नंदुरबार येथुन हस्तगत करुन आरोपीस केले जेरबंद


लोकनेता न्युज नेटवर्क

हवेली (संतोष कदम) :- दिनांक २५/०९/२०२५ रोजी रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे येथील मा. भगवती ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटनेर ट्रक नंबर MH-12-TV-1024 यामध्ये कटकेवाडी येथील मारुती वेअरहाऊस येथुन हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज लोड करुन सदरचे फ्रिज शिल्पा इलेक्टॉनिक्स, राजकोट, गुजरात येथे पोहच करण्यासाठी नमुद कंटनेर ट्रकवरील ड्रायव्हर घेवुन गेला होता. परंतु दिनांक २७/०९/२०२५ रोजी शिल्पा इलेक्टॉनिक्स, राजकोट, गुजरात येथे कंटेनर ट्रक पोहचला नसल्याने तसेच कंटेनर ट्रक वरील ड्रायव्हरचा फोन बंद लागत असल्याने व कंटेनर ट्रकचे जीपीएस लोकेशन सुरत, गुजरात येथे एकाच ठिकाणी दाखवित असल्याने मा. भगवती ट्रान्सपोर्ट कंपनीचे मॅनेजर यांनी नमुद जीपीएस लोकेशनवर दुसरा कंटेनर ट्रक ड्रायव्हरला पाठविले असता नमुद ठिकाणी कंटेनर ट्रक मिळुन आला नाही. त्यावेळी मॅनेजर यांना कंटनेर ट्रक ड्रायव्हरने कंटेनर ट्रक व त्यामधील मालाचा अपहार केल्याची खात्री पटल्याने त्यांनी नमुद कंटेनर ट्रक व त्यामधील हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज असा एकुण ३५,७९.६६०/- रु. किमतीच्या मालाचा अपहार केलेबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३८६/२०२५ भा.न्या.सं.क. ३१६ (३),३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोउपनि अर्जुन बेंदगुडे व त्यांचा स्टाफ असे कंटनेर ट्रकवरील ड्रायव्हरचा शोध घेत असताना अपहार झालेला कंटनेर ट्रक हा नंदुरबार येथील आर. के. पेट्रोलियम येथे असलेबाबत यातील फिर्यादी यांचेकडुन माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठांचे आदेशाने पोउपनि अर्जुन बेंदगुडे व त्यांचा पोलीस स्टाफ तपासकामी नंदुरबार येथे गेले असता आर. के. पेट्रोलियम येथे कंटनेर ट्रक नंबर MH-12-TV-1024 हा बेवारस अवस्थेत मिळुन आल्याने सदरचा कंटेनर ट्रक ताब्यात घेवुन जप्त केला. तसेच नमुद कंटेनर ट्रक ड्रायव्हर व त्यामधील अपहार झालेल्या मालाबाबत पोउपनि अर्जुन बंदगुडे व त्यांचा स्टाफ यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन गोपनीय बातमीदाराचे मार्फतीने माहिती प्राप्त करुन कंटेनर ट्रक डायव्हरचा साथीदार आरोपी नामे निसार अहमद इसाक खान, वय ३५ वर्ष, रा. शास्त्री मार्केट, मंगल बाजार नंदुरबार यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन अपहार झालेले हायर कंपनीचे एकुण १२० फ्रिज एका खेडे गावातील घरातुन ताब्यात घेवुन एकुण ३५,७९,६६०/- रु.किं.चा माल जप्त करुन नमुद आरोपीस दि.२२/१०/२०२५ रोजी नमुद गुन्हयात अटक करण्यात आले आहे. पुढील अधिक तपास पोउपनि अर्जुन बेंदगुडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. सर्जेराव कुंभार तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अर्जुन बेदगुडे, पोलीस अंमलदार कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, किरण पलांडे, अमोल ढोणे व सुधीर शिवले यांनी केली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments