लोकनेता न्यूज नेटवर्क
मुक्रमाबाद (दादाराव गुमडे) :- दि.१६ मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे भारताचे मा. राष्ट्रपती डॉ .ए.पि.जे.अब्दुल कलाम यांची ९४ वी जयंती मोठ्या उत्स्हात साजरी करण्यात आली. मुक्रमाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण एन्मुलवाड व मिञमंडळाच्या वतीने डॉ .कलाम यांची जयंती मोठ्या उत्स्हात साजरी करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे ( अजित दादा गट ) प्रदेश उपाध्यक्ष मा.शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर तर उदघाटक म्हणून राष्ट्रवादीचे दिव्यांगशेलचे उपाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर ,सुरेश सावकार पंदिलवार, सुभाष अप्पा बोधणे, तम्माप्पा गंदिगुडे, डॉ , अनिल पंदिलवार सह शहरातील व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. गोजेगावकर व सुमठाणकर यांची रथातुन भव्य मिरवणूक काढुन मुख्य बसस्थानक येथे जे.सी.बी.च्या माध्यमातून पुष्प उधळत बँड वाजत गाजत सभास्थानी विराजमान झाल्या नंतर कार्यक्रमाची सुरुवात डॉ .बाबासाहेब आंबेडकर व डॉ .ए.पि.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येवुन जयंती मंडळाच्या वतीने व्यासपिठावरील सर्वच मान्यवरांचे फेटे बांधुन फुलांच्या एका मोठ्या गुलाब हराणी भव्य असे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक मुखेड येथील पञकार रियाज शेख यांनी केले.यावेळी संयोजन समितीच्या वतीने मुख्य आयोजक लक्ष्मण एनमुलवाड व सरपंच प्रतिनिधी बालाजी बोधणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुमठाणकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, डॉ .कलाम हे जागतिक किर्तीचे नेते होते , त्यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर जागतीक पातळीवर भारत देशाचा ठस्सा चांगल्या प्रकारे उमटविले असुन विज्ञान व तंञज्ञानाच्या माध्यमातून जगाला एक ओळख निर्माण करुन दिल्याचे सुमठाणकर म्हणाले. पुढे अध्यक्षिय समारोपात गोजेगावकर म्हणाले की, आज आपण ज्यांची जयंती साजरी करीत आहोत की, ज्यांनी तरुणांना विज्ञानाच्या व तंञज्ञानाच्या माद्यमातुन आकाशालाही गवसनी घालता येते. तरुणांनी स्वप्न व ध्येय उराशी बाळगुन आपले या माध्यमातून साकार करावे असे मत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे मोशीन कोतवाल,अब्दुल पटेल,रफी कुरेशी,अजय पवार आदींनी परिश्रम घेतले.पञकार रज्जाक कुरेशी यांनी सुञसंचलन केले तर आभार प्रदर्शन मुक्रमाबाद नगरीचे उप सरपंच सदाशिव बोयवार यांनी केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment